Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. अशातच आता राज्यभरातील शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांच्याविरुद्ध भव्य असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 11 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये हा भव्य मोर्चा निघणार आहे. विशेष म्हणजे शिक्षक-पदवीधर आमदार या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केली. एवढचं नाही तर बहुतांश शिक्षक खोटे कागदपत्रे तयार करून मुख्यालयी न राहता घरभाडे उचलत असल्याचा आरोप आमदार बंब यांनी केला. बंब यांच्या याच आरोपावरून शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत बंब यांनी माफी मागण्याची मागणी केली. मात्र बंब आपल्या मागणीवर कायम असल्याने आता आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात राज्यातील शिक्षक एकवटणार आहे. 11 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा भव्य मोर्चा आमदार बंब यांच्याविरोधात काढला जाणार आहे. या मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक आमदार कपिल पाटील, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि आमदार सुधीर तांबे हे करणार आहे.
गावात क्वार्टर बनवून द्यावे...
आमदार बंब यांनी शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा उपस्थित केला असता त्यांना शिक्षकांकडून उत्तर देण्यात आले आहे. अनेक गावात राहण्यासाठी घरे मिळत नाही. त्यामुळे आधी शिक्षकांसाठी गावात क्वार्टर बनवून द्यावे त्यानंतर आम्ही तिथे राहण्यासाठी तयार असल्याचं शिक्षकांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्हीकडून होत असलेल्या आरोपामुळे हा वाद आणखीच तापतांना पाहायला मिळत आहे.
प्रशांत बंब यांच्याविरुद्ध शिक्षक-पदवीधर आमदारही आक्रमक
आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांसोबतच शिक्षक-पदवीधर आमदारांवर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत. शिक्षकांच्या चुकीच्या कृतीला शिक्षक आणि पदवीधर आमदार यांचा पाठींबा मिळतो. त्यामुळे आता शिक्षक-पदवीधर मतदारसंघ बंद केली पाहिजे अशी मागणी बंब यांनी केली आहे. त्यांच्या याच मागणीवरून शिक्षक-पदवीधर आमदारांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. तर 11 सप्टेंबरला औरंगाबादमध्ये आमखास मैदानावरून निघणाऱ्या मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक-पदवीधर आमदार करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची गावागावातून आमदार प्रशांत बंब यांनी मागवली माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI