Aurangabad News: देशभरात थैमान घालणाऱ्या लिंपी आजाराचा फैलाव (Lumpy Skin Disease) आता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच 9 तालुक्यात पाहायला मिळत आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत बाधित जनावरांची संख्या 325 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच आतापर्यंत 8  जनावरांचा लिंपीने बळी घेतला आहे. 

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 63 गावांमध्ये 315 लिंपीबाधित जनावरे आढळली आहेत. बाधित जनावरे आढळलेल्या पाच किलोमीटर परिघातील जनावरांचे लसीकरण करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे अंदाजे पावणेदोन लाख जनावरांना लस द्यावी लागणार आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यातील 74 हजारांवर जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर उपचाराने 173 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. तसेच 142  जनावरांवर उपचार सुरू असून, 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

सद्याची परिस्थिती...

बाधित तालुके  09
बाधित जनावरे असलेली गाव  63
एकूण बाधित जनावरे  315
लसीकरणाचे उद्दिष्ट  1,85,401
लस दिलेली जनावरे  74,060
बरी झालेली जनावरे  173
उपचार सुरु असलेली जनावरे  142
मृत्यू पावलेली जनावरे  08

लस आली, पण देणार कोण? 

लिंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद,जालना,बीड आणि परभणी या चार जिल्ह्यासाठी 3 लाख लसी आल्या आहेत. मात्र या लसी जनावरांना देण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे 3 लाख लसी देणार कोण असा प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. तर यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमून लसीकरण करून घेण्याच्या हालचाली पशुसंवर्धन विभागाकडून सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या... 

Lumpy Skin Disease : राज्यातील 27 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव,  3 हजार 291 जनावरे रोगमुक्त, आज 25 लाख लसमात्रा उपलब्ध होणार : पशुसंवर्धन आयुक्त

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रशासन सतर्क, जनावरांची ने आण करण्यास पुर्णतः बंदी