Aurangabad News: सकाळी अकरा वाजता मंत्रीमंडळ शपथविधी होणार असून, अनेक नावें समोर येत आहेत. तर अनेक जण अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांचा सुद्धा समावेश आहे. तर संदिपान भुमरे आणि अतुल सावे यांचे नावं निश्चित समजली जात आहे. आतापर्यंत शिरसाट सुद्धा शपथ घेणार असल्याची चर्चा असतांना आता शिरसाट वेटिंग लिस्टमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. 


उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेल्या बंडात सर्वात आधी उघडपणे ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये शिरसाट यांचा समावेश आहे. तर शिरसाट हे शिंदे यांच्या जवळचे असल्याने त्यांना संधी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अजूनही शिरसाट यांना कोणताही फोन आला नसून, त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच अब्दुल सत्तार हे सुद्धा वेटिंग लिस्टमध्ये आहेत. तर संजय राठोड यांच्या नावावर सुद्धा अजूनही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहेत. 


कुणाचा पत्ता कट होणार...


शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री पदाची घोषणा करतांना एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करतांना सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला होता. त्यामुळे मंत्रीमंडळ शपथविधीत सुद्धा असेच काही होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या आमदारांपैकी ऐनवेळी कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


शिंदे गटातून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ


1) उदय सामंत (Uday Sawant)
2) दादा भुसे (Dada Bhuse) 
3) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai))
4) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
5) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
6) भरत गोगावले (Bharat Gogawale)


भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ


1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरीश महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
9) विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)