Aurangabad News: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज औरंगाबादमध्ये शिक्षक संघटनेकडून विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.  यापूर्वीही संघटनामार्फत अनेक वेळा मोर्चा, धरणे आंदोलन करूनही योग्य ती कारवाई न झाल्याने शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात होता. त्यांनतर शिक्षक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. 


या आहेत प्रमुख मागण्या....



  • दिनांक 1 नोव्हेंबर नोव्हेबर 2005  नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

  • प्रदीर्घ काळापासून प्रलंबीत शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक पदोन्नती तात्काळ करण्याबाबत संबधीत यंत्रणेला आदेशीत करावे.

  • जिल्हा परिषद प्रशालेत अनेक वर्षापासून वर्ग 2  व 3 चे राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रिक्त असून, ती पदे तात्काळ भरण्यात यावीत.

  • वस्तीशाळा शिक्षकांची मुळ नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा.

  • शिक्षक आमदार मतदार संघात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा हक्क दयावा, खाजगी शाळा

  • शिक्षक व सरकारी शाळा शिक्षक असा भेदभाव का? जि.प.प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क दयावा.

  • समानीकरणाच्या नावाखाली हजारो पदे रिक्त ठेवली असून रिक्तचा गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे समानीकरणाचे धोरण रद्द करून शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.

  • जिल्हा व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय असलेली अतिरिक्त वेतनवाढ शासनस्तरावरून विनाअट देण्यात यावी. 4 सप्टेंबर 2018 चा शासन आदेश दुरूस्त करून प्रत्येक वर्षीच्या जिल्हा पुरस्कार व राज्य पुरस्कार पाप्त शिक्षकांना अतिरिक्त वेतनवाढी मुजुर कराव्यात.

  • सन 2014  ची अधिसूचनेमधील पदोन्ती करतांना स्पर्धा परीक्षा, विभागीय स्पर्धा परीक्षा व सरळ सेवाच्या माध्यमातून विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख रिक्त पदे भरण्याचे आदेश काढण्यात आले होते. परंतु मागील 8 वर्षात विभागीय स्पर्धा परीक्षा अथवा सरळसेवा परीक्षा घेण्यात आली नसल्याने राज्यभर 50 टक्याहून अधिक विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख रिक्तचं असल्याने अधिसूचना रद्द करून पूर्ववत सेवाजेष्टनेनुसार पदोन्नत्या करण्यात याव्यात.

  • सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


आपल्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक संघटनेकडून काढण्यात आलेल्या भव्य मोर्च्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त पाहायला मिळाला. वरून रिमझिम पाऊस सुरु असतांनाही पोलिसांचा मोर्च्यास्थळी खडा पहारा पाहायला मिळाला. तर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी संघटनेच्या मोजक्या समन्वयकांना आतमध्ये सोडण्यात आले होते. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI