Aurangabad News: मुलं चोरीचे अनेक फेक मॅसेज आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या अफवांमुळे अनेक ठिकाणी निर्दोष लोकांना मारहाण झाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. त्यातच अशीच काही घटना शनिवारी औरंगाबादमध्ये समोर आली असून, मुलं चोरीच्या अफवांचे लोण औरंगाबादपर्यंत पोहचले आहे. दरम्यान वेशांतर करून मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवेने शहरातील एका मेकअप आर्टिस्टला जमावाने बेदम मारहाण केली आहे. शहरातील जवाहरनगर परिसरात ही घटना घडली आहे.
विश्वभारती कॉलनीत शाळा सुटण्याच्या वेळी एका शाळेसमोर पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी एकत्र आले होते. याचवेळी शाळेसमोरून एक व्यक्ती महिलांचे कपडे परिधान करून तोंडाला स्कार्फ बांधून जात असल्याचे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. त्यामुळे ही बाब त्याने उपस्थित लोकांना सांगितली. लोकांनी पाठलाग करून साडी घातलेल्या व्यक्तीला पकडून चौकशी केली असता, तो पुरुष असल्याचे समोर आले. दरम्यान हा व्यक्ती मुले पळवण्याऱ्या टोळीतील असल्याचा संशय करत नागरिकांनी त्याला मारहाण करायला सुरवात केली.
पोलिसांनी धाव घेत केली सुटका...
एका शाळेत वेषांतर केलेल्या व्यक्तीला नागरिकांनी पकडले असून, त्याला मारहाण केली जात असल्याची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्या व्यक्तीची सुटका करून, त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता तो, मेकअप आर्टिस्ट असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांचे आवाहन...
मुले पळवणारी टोळी शहरात आली असल्याचे अफवा सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे नागरिकांनी यावर विश्वास न ठेवता कुठल्या व्यक्तीवर संशय आल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधावे असे आवाहन पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले आहेत. तर अशा कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवुन नये किंवा भिती बाळगु नये. जिल्हा पोलीसांनी या अफवेची शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे. घर गल्ली, किंवा परिसरात संशयास्पद अनोळखी व्यक्ती, वाहन, आढळल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. स्वत:हुन अशा संशयास्पद व्यक्तीस मारहाण अगर वाहनास तोडफोड, करु नये कायदा हातात घेऊ नयेत असे आवाहन औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: शाळेत भरली भाकरी बनवण्याची स्पर्धा, शिक्षकांच्या संकल्पनेची जिल्ह्याभरात चर्चा
मोठी बातमी! मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न