Aurangabad News: घरात दिवसभर राब राब राबणाऱ्या आईचं काम दिसत नाही आणि आपण सहज म्हणतो आई कुठे काय करते. दिवसभर राबणाऱ्या याच आईचे महत्व कळावं म्हणून औरंगाबादच्या दोन जिल्हा परिषदेच्या शाळांनी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. ज्यात भाकरी करण्याची आणि कपडे धुण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी सुद्धा या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या स्पर्धेनंतर मुलांना आईच्या कामांचा महत्व कळाले. 


औरंगाबादच्या वंदनाच्या ज्ञानेश विद्यामंदिर आणि गंगापूरच्या गाजरमळा जिल्हा परिषद शाळेत अभ्यासाची तयारी करणाऱ्या मुलांची आज वेगळीच धडपड सुरु होती. कुणी चूल मांडत होतं तर कुणी त्यात लाकडं टाकून पेटवण्याचा प्रयत्न करत होतं. तर काही जण भाकरीसाठी पीठ मळत होते. या सर्वांचं लक्ष होतं आईसारखी गोल गरगरीत भाकर तयार करण्याचं. मोठ्या कष्टाने या मुलांनी भाकर बनवली सुद्धा, पण यासाठी त्यांना बसलेले चटके आणि करावा लागलेल्या कष्टाने आईच्या कष्टांची जाणीव करून दिली. मुलांना झालेल्या जाणीवामुळे शिक्षकांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचं हेतूही साध्य झालं.


कपडे धुण्याची स्पर्धा... 


ज्याप्रमाणे भाकरी बनवण्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती, त्याचप्रमाणे गंगापूरच्या गाजरमळा जिल्हा परिषद शाळेत कपडे धुण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात कपडे धुण्यासाठी मुलांना शाळेतच दोन बकेट पाणी देण्यात आले. एका मुलाला 15  मिनिटांत तीन ड्रेस स्वच्छ धुऊन काढण्याचा नियम होता. या स्पर्धेत चौथीच्या वर्गातील 16  तर पाचवीच्या वर्गातील 19 मुलांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गावातील महिलांनी भूमिका पार पाडली. 


भाकरीची स्पर्धा अशी पार पडली...



  • स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एका ग्रुपला पाच भाकरी करणे अनिवार्य होते. 

  • यासाठी लागणारे सर्व साहित्य मुलांनी स्वतःच्या घरून आणले होते. 

  • भाकरीचा आकार गोल आणि ती चांगली भाजलेली असावी होती. 

  • मुलांना भाकरी तयार करण्यासाठी दोन तासांचा वेळ होता. 

  • स्पर्धेतील सहभागी झालेल्या मुलांमधून अंतिम तीन क्रमांक काढण्यात आले. 

  • स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाळेतील महिला शिक्षकांनी भूमिका पार पाडली. 

  • चांगली भाकरी तयार करणाऱ्या संघास प्रथम पारितोषिक म्हणून 501  रुपयांचे बक्षीस देण्यात आले. 

  • तर द्वितीय क्रमांकासाठी 309  रुपये आणि तृतीय 201  रुपये पारितोषिक देण्यात आले. 


महत्वाच्या बातम्या... 


Aurangabad: औरंगाबादमध्ये 'मविआ'चं आंदोलन; शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी


Aurangabad: कर्णपुरा यात्रोत्सवाची जय्यत तयारी, पाच सप्टेंबरपासून 'हे' मार्ग राहणार बंद


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI