Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाचवेळी तब्बल तीन कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे आज औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे या तिन्ही मंत्र्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी एकमेकांविरोधात चांगलीच फटकेबाजी केली. तर अब्दुल सत्तारांनी कृषी विभागाच्या एका उपक्रमाबाबत उपस्थितांची मते जाणून घेण्याच्या प्रयत्नात स्वतःची गोची करून घेतल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झालं असे की, अब्दुल सत्तार यांचे भाषण सुरु होताच त्यांनी सर्वात आधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंर बाण सोडला. या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांना बोलवायला पाहिजे होतं. पण भागवत कराड हे लोकल असून, हात दाखवा गाडी थांबवा...पण आमची गाडी सुसाट असल्याचं म्हणत त्यांनी दानवे यांच्यावर निशाना साधला. तर पुढे बोलतांना त्यांनी उपस्थितांकडे पाहून एक दिवस शेतकऱ्यांसोबत उपक्रम राबवत असून, तुमच्या गावात कोणी आलं का? असा प्रश्न विचारला. मात्र समोर बसलेल्या लोकांनी, कोणीच आलं नसल्याचे सांगितले. त्यामुळे काही वेळेसाठी सत्तार यांची गोची झाली. पण त्यांनी वेळ मारून नेत, आपलं पुढील भाषण संपवलं.
सत्तार भडकले...
औरंगाबाद जिल्हा बँकतर्फे सुरवातीला रोहयो मंत्री संदिपान भुमरे,कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि सहकार मंत्री अतुल सावे यांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर नेत्यांच्या भाषणाला सुरवात झाली. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या भाषणाला सुरवात झाल्यावर व्यसपीठावरील नेते चर्चा करत असल्याचे पाहून सत्तार संतापले. असं बोलणं बरं नसून, यापुढे तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. आम्ही चूक केली का? तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला बोलवा आम्ही येऊ म्हणून, असे म्हणत सत्तार यांनी नेत्यांचे कान टोचले.
तुमचा गाजरांचा धंदा...
पुढे बोलतांना सत्तार कार्यकर्त्यांना तुम्हाला राजकीयदृष्ट्या मोठं व्हायचं असल्याचं सांगत असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यसपीठावरून गाजर देत असल्याचा टोला लगावला. त्यावर उत्तर देतांना सत्तार म्हणाले की, आमदार करण्याचा तुमच्या सारखा आमचा गाजराचा धंदा नाही. आमचं हातभर इकडे अन्यथा हातभर तिकडे आहे. कमजोर लोकं असे धंदे करतात. आपला हुकमी एक्का असतो असं सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: गडकरी साहेब, औरंगाबाद-पैठण चौपदरीकरण जादूने करणार का?; जलील यांचा खोचक टोला