Aurangabad: देशभरातील अनेक राज्यांत थैमान घालणाऱ्या लंपी स्किन आजाराने (Lumpy Skin Disease) आता महराष्ट्रात सुद्धा पाय पसरायला सुरवात केली आहे. त्यातच आता याचा प्रादुर्भाव औरंगाबादमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पाच तालुक्यातील जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 32 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. 


औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हयात औरंगाबाद तालुक्यातील तिसगांव, सिल्लोड तालुक्यात बाळापुर, सोयगांव तालुक्यात फर्दापुर, पैठण तालुक्यात शेकटा, ढाकेफळ, ढोरकिन, कौडगांव आणि गंगापुर तालुक्यात गंगापुर या ठिकाणी जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.


जिल्हयातील सद्याची परिस्थिती...



  • जिल्हयातील एकुण पशुधन 6 लाख 26 हजार 888

  • गायवर्ग 5 लाख 34 हजार 394, म्हैस वर्ग- 92 हजार 494 

  • एकुण बाधित तालुक्यांची संख्या 5 झाली आहे. 

  • एकुण बाधित गावांची संख्या 8 आहे.

  • पाच किमी परीघातील गावांची संख्या 29 आहे.

  • जिल्ह्यात एकूण बाधित पशुधन संख्या 32 आहे.

  • आतापर्यंत औषधोपचाराने बरे झालेले पशुधन संख्या 29 आहे.

  • आतापर्यंत 5 हजार 525 जनावरांचे लसिकरण करण्यात आले आहे. 

  • लंपीमुळे मृत जनावरे संख्या 00 आहे. 


प्रशासनाचे आवाहन...



  • लंपी रोगाचा प्रार्दुभाव वेगाने पसरु नये यासाठी पशु पालकाने सतर्क राहणे आवश्यक आहे.

  • यासाठी प्रतिबंधात्मक योजना करणे आवश्यक आहे.

  • या रोगाचा प्रसार गोचीड, गोमाशा, मच्छर यामुळे होते 

  • त्यामुळे जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परीसरात संबंधित ग्रामपंचायत,नगरपंचायत, महानगरपालिका यांच्याकडील यंत्रनेने तात्काळ फवारणी करुन घेण्यात यावी.

  • रोग प्रादुर्भावामुळे पशु मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याची सर्वस्वि जबाबदारी ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका यांची राहील.

  • या रोगाचे लक्षणे पशुमध्ये आढळुन आल्यास प्रत्येक व्यक्ति, अशासकिय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी लेखी स्वरुपात नजिकच्या पशुवैदयकिय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

  • पुर्ण जिल्हयामध्ये जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय रॅपीड रिस्पॉन्स टिम तयार करण्यात आलेले आहेत.


लंपीचे लक्षणे 



  • पशुना ताप येणे

  • पुर्ण शरीरावर गाठी येणे 

  • तोंड नाक व डोळयात व्रण निर्मान होणे

  • अशक्त पणा भुक कमी होणे

  • दुध उत्पादन कमी होणे

  • फुफुस दाह स्तनदाह होणे.


महत्वाच्या बातम्या...


एनडीआरएफच्या निकषानुसार जनावरांच्या लम्पी आजारावर मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 


Lumpy Skin Disease : राज्यातील 18 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, प्रशासन सतर्क, राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित