Aurangabad News: औरंगाबाद शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहितीचे QR कोड तयार करण्याचे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. सोमवारी संध्याकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात (Smart City Office) जी-20 (G20) च्या पार्श्वभूमीवर ब्रॅण्डिंग समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहिती QR कोड मध्ये उपलब्ध करून त्या इमारतीसमोर लावण्याचे निर्देश दिले दिले आहेत. त्यामुळे आता QR कोड स्कॅन केल्यावर त्या वस्तूची माहिती पर्यटकांना (Tourists) सहजपणे उपलब्ध होणार आहे.
सद्या सर्वत्र डीजीटल प्रणालीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. कोणतेही माहिती मोबाईल आणि इंटरनेटवर सहज मिळून जाते. तसेच आपण कॅमेरा किंवा स्कॅनरच्या मदतीने QR कोड स्कॅन केल्यास संबधित वस्तूची माहिती येऊन जाते. हीच बाब लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी आता औरंगाबाद शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहितीचे QR कोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता QR कोड स्कॅन केल्यावर त्या वस्तूची माहिती पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार आहे.
जी-20 परिषदसाठी नियोजन!
जी-20 परिषद साठी वातावरण निर्मिती करण्याकरिता शाळेतील चित्रकला स्पर्धाचे आयोजन करणे, तसेच जी20 परिषद नेमका काय आहे? याची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश आयुक्त चौधरी यांनी दिले आहे. याशिवाय परिषदेत सहभागी होणारे सर्व वीस देशांचे झेंडे शहरातील लावण्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी सांगितले. सदरील बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी शिक्षण अधिकारी संजय सोनार स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी आणि जलसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांची उपस्थिती होती.
किले अर्क येथील बौद्ध विहाराची पाहणी
दरम्यान शहरातील किले अर्क येथील करुणा बौद्ध विहार व सुधाकरराव भुईगळ सामाजिक सभागृहचे नूतनीकरण करणेबाबत आयुक्त अभिजीत चौधरी यांनी स्थळ पाहणी केली. सदरील नूतनीकरणाच्या कामात सामाजिक सभागृहाच्या इमारतीच्या उजव्या कोपऱ्यावरील मुख्य दरवाजा स्थलांतरित करून तो सभागृहाच्या मध्यभागी मुख्य दरवाजा बसविणे, सभागृहाच्या समोरील भिंतीचे एलिवेशन ट्रीटमेंट बदलणे इत्यादी कामांचा समावेश होता. याबाबत आयुक्तांनी मुख्यद्वार स्थलांतरित करण्याची मंजुरी दिली तसेच सभागृहात शौचालय बांधणे आणि छताची वॉटरप्रूफिंग करणे संदर्भात सूचना केल्या.
वेरुळ येथील प्रस्तावित वळण रस्त्याला उच्चाधिकार समितीची मंजुरी; वाहतूक कोंडी सुटणार