Marathwada Teacher Constituency Election: राज्यात होत असलेल्या पाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा ठरला आहे.  दरम्यान आज या निवडणूकीची मतमोजणी सुरु असताना शिक्षकांचा जुनी पेन्शन योजनेवरून (Maharashtra Old Pension Scheme) मतपत्रिकेतून रोष पाहायला मिळत आहे. कारण बाद झालेल्या अनेक मतपत्रिकेतून निषेधाचे मजकूर वाचायला मिळत आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरु असताना हा प्रकार समोर आला आहे. 'नो पेन्शन, नो व्होट', जुनी पेन्शन योजना द्या असे मजकूर मतपत्रिकेतून समोर आले आहे. 


शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जुनी पेन्शन योजनेवरून खरा प्रचार झाला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील आपल्या प्रचार सभेतून याचा उल्लेख केला होता. दरम्यान याच मुद्यावरून शिक्षकांनी आपला रोष मतपत्रिकेतून व्यक्त केला आहे. दरम्यान औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यातून 61 हजार 529 शिक्षक मतदारांपैकी 53 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामधील 2 हजार 385 मते बाद झाली आहे. तर मतपत्रिकेत 'नो पेन्शन, नो व्होट', जुनी पेन्शन योजना द्या असे मजकूर लिहल्याने ही मते बाद झाली आहे. 


मतदान बाद होण्याची कारणं... 


औरंगाबाद विभागात दोन हजारपेक्षा अधिक मतपत्रिका बाद होण्याचे वेगवेगळे कारणं आहेत. ज्यात आपल्या वेगवेगळ्या मागण्या शिक्षक करत असतात. त्यामुळे या मतपत्रिका बाद होतात. जुनी पेन्शन योजनाचा मजकूर अनेक मतपत्रिकेत पाहायला मिळाला आहे. यावेळी अनेक मतपत्रिकेत 'नो पेन्शन, नो व्होट', जुनी पेन्शन योजना द्या असे मजकूर पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी कोणेही निवडून या पण जुनी पेन्शन योजना लागू करा असेही लिहलेले होते. सोबतच काही ठिकाणी मराठा आरक्षणाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. तर बाद झालेल्या 10 पैकी अंदाजे चार ते पाच मतपत्रिकेवर वेगवेगळे मजकूर लिहल्याचे पाहायला मिळाले आहे. 


दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात 


दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली असून, दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे निकाल हाती येण्यासाठी अंदाजे रात्री 10 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या पसंतीच्या फेरीत 25 हजार 386 चा कोटा काढण्यात आला होता, मात्र एकही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada MLC Election: विक्रम काळे चौकार मारणार की, परिवर्तन होणार? मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात