Aurangabad News: भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यात मुख्यालयी न राहण्याच्या मुद्यावरून सुरु असलेल्या वादात रोज नवनवीन घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच आता आमदार बंब यांनी नवीनच मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण संबधित शिक्षक जोपर्यंत मुख्यालयी राहत नाही तोपर्यंत त्या शिक्षकाचे मासिक वेतनच थांबवण्याची मागणी बंब यांनी केली आहे. बंब यांनी जिल्हा परिषद सीईओ यांना पत्र पाठवून याबाबत मागणी केली आहे.
आमदार बंब यांनी जिल्हा परिषद सीईओ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे शासन नियमाप्रमाणे बंधनकारक आहे. तसेच या अगोदरही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यासाठी पत्रक काढून आदेशित केले होते. परंतु यास न जुमानता संबंधित अधिकारी-कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत. सदर प्रकार फौजदारी गुन्हेगारी स्वरुपाचा असुन आजपावेतो संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ताबडतोब रोखण्यात यावेत. जोपर्यंत संबंधित शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, तोपर्यंत त्या शिक्षकांचे मासिक वेतन देण्यात येऊ नये. तसेच आजपर्यंत शासन निर्णय न पाळल्याने संबंधित शिक्षकांकडून वेतन वसुल करण्यात यावे, अशी मागणी आमदार बंब यांनी केली आहे.
नव्या वादाला तोंड फुटणार...
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला जिल्हा परिषद शिक्षक आणि आमदार बंब यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला आहे. त्यातच आता मुख्यालयी न रहाणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचीच मागणी आमदार बंब यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक आक्रमक होण्याची शक्यता असून, आमदार यांच्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
उद्या शहरात भव्य मोर्चा...
आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेविरोधात उद्या औरंगाबाद शहरात भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. ज्यात औरंगाबादसह मराठवाड्यातील शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शिक्षक-पदवीधर आमदार या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
आता नवीन वाद! मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याचे आदेश
Aurangabad: आमदार प्रशांत बंब यांच्याविरुद्ध राज्यभरातील शिक्षक एकवटणार; 11 सप्टेंबरला भव्य मोर्चा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI