Jayakwadi Dam: नाशिक जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वरील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सुद्धा पाण्याची आवक वाढली आहे. आज दुपारी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून एकुण 56 हजार 592 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पाहता गणेश भक्तांनी नदी पात्रात विसर्जनासाठी जाऊ नयेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


पैठण येथील जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये 56  हजार 592  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नदी काठावरील गावातील नागरिकांनी गणपती विसर्जनासाठी नदीत उतरू नयेत असे आवाहन पोलिसांनी केली आहे. तर नदी काठच्या गावात पोलिसांकडून गस्त सुद्धा घातली जात आहे. तर गावातील पोलीस पाटील यांना सुद्धा नदी काठावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


आत्ताची परिस्थिती...



  • दुपारी दोन वाजेच्या दरम्यान द्वार क्र. 10 ते 27 असे एकुण 18  दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले आहे.  

  • नांदूर मधमेश्वर मधून 34425 क्यूसेक इतका विसर्ग केला जात आहे. 

  • देवगड बंधारा 3 हजार 405 क्यूसेक आणि गंगापूर धरणातून 2 हजार 546  क्यूसेकने आवक सुरु आहे. 

  • तसेच होळकर ब्रीज इथून 7 हजार 204 क्यूसेक इतका विसर्ग केला जात आहे.

  • त्यामुळे गोदावरी नदीपात्रात आणखी 9 हजार 432 क्युसेक विसर्ग वाढ करण्यात येईल.

  • जायकवाडी धरणात सध्या एकूण 48 हजार 334  क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे.

  • तर जायकवाडी धरणातून सध्या 56 हजार 592 क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

  • जायकवाडी धरणात 97 टक्के पाणीसाठा आहे.   


गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आश्वासन


जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने कुणीही नदी पात्रात उतरू नयेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच वरील धरणातून पाण्याची आवक वाढल्यास पाण्याचा विसर्गही वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


महत्वाचे बातमी...


Aurangabad: औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय मानपान नाट्य; अंबादास दानवेंकडून शिवीगाळ


Aurangabad: पाच हजाराच्या मोबाईलच्या नादात 26 हजार गमावले; असा फसला कुरियर बॉय