Aurangabad News: औरंगाबाद येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होता. त्यामुळे फेसबूक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई येथे असताना त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्च्याच्या दोन समन्वयकांमध्ये झालेल्या संभाषणाची कथित ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यात औरंगाबादचे रमेश केरे यांनी आंदोलनाच्या नावाखाली पैसे घेतल्याचा त्यात आरोप करण्यात आला होता. मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचा खुलासा केरे यांनी केला होता. परंतु त्यानंतर सुद्धा त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत असल्याने, त्यांनी आज मुंबईत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 


कोण आहेत रमेश केरे...


कोपार्डीच्या घटनेनंतर राज्यभरात लाखोंच्या संख्यांनी मोर्चे निघाले होते. मात्र पहिला मोर्चा औरंगाबाद शहरात निघाला होता. विशेष म्हणजे हा मोर्चा काढण्यात रमेश केरे यांची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात केरे यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी अनेकदा आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या घरावर त्यांनी मोर्चे काढले होते. त्यामुळे केरे नेहमीच चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून केरे यांनी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप सतत सोशल मीडियावर सुरु होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 


संबंधित बातम्या..


मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी घेतले कोट्यवधी रुपये?; कथित ऑडीओ क्लिपने खळबळ


Aurangabad: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या माध्यमातून राज्यात उद्रेक घडवण्याच्या प्रयत्न; राजकीय पक्षांवर गंभीर आरोप