Ajit Pawar In Aurangabad: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात अजित पवार पैठण आणि वैजापूर येथील शेतकरी मेळाव्यात देखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळीच जालना येथून मोटारीने प्रयाण करत सकाळी 11 वाजता अजित पवार पैठण येथे पोहचतील. त्यानंतर अजित पवार हेलिकॉप्टरने वैजापूरला पोहचतील. तर वैजापूर येथील शेतकरी मेळाव्यानंतर ते मुंबईला विमानने रवाना होतील. 


आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षाचे नेते वेगवेगळ्या जिल्ह्याचे दौरे करत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांचे दौरे होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा दौरा होत आहे. यावेळी अजित पवार आज जिल्ह्यातील पैठण आणि वैजापूरचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे वैजापूर येथील त्यांचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. 


पैठणमध्ये स्वागतासाठी जोरदार तयारी... 


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर असल्यामुळे, स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर पैठणमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठी कालपासूनच मंडप टाकण्यात येत आहे. तसेच अजित पवारांच्या मेळाव्यासाठी जास्तीत-जास्त गर्दी जमवण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. तर अशीच काही तयारी वैजापूर येथील शेतकरी मेळाव्यासाठी देखील केली जात आहे.


असा असणार अजित पवारांचा दौरा!


सकाळी 11 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, पैठण, औरंगाबाद येथे आगमन


सकाळी 11 वाजता: शेतकरी मेळावा पैठण येथे उपस्थित


दुपारी 01 ते 01.40 वाजता: माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे यांच्या घरी राखीव व नंतर मोटारीने प्रयाण


दुपारी 01.45 ते 01.50 वाजता: कै.दिगंबरराव कावसानकर स्टेडियम हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने वैजापूरकडे प्रयाण 


दुपारी 02.20 वाजता: संजिवनी अकॅडमी परिसर, वैजापूर येथे हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन व नंतर मोटारीने प्रयाण


दुपारी 02.30 वाजता:  जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) मैदान वैजापूर येथे आगमन आणि शेतकरी मेळाव्यास उपस्थिती


सायंकाळी 04.25 वाजता: संजिवनी अकॅडमी परिसर वैजापूर हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण


सायंकाळी 05.10 वाजता: औरंगाबाद चिकलठाणा विमानतळावर आगमन


सायंकाळी 06.20 वाजता: विमानाने मुंबईकडे प्रयाण 


07.15 वाजता: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल 1), मुंबई येथे आगमन


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aaditya Thackeray: नेहमी 'ब्ल्यू शर्ट'चं का घालता?; आदित्य ठाकरे आधी लाजले, नंतर म्हणाले की...