Aaditya Thackeray In Aurangabad: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. यासाठी आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक सभांना हजेरी लावत आहे. सोबत ठिकठिकाणी त्यांचे शिवसैनिकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या अंगातील 'ब्ल्यू शर्ट'ची (Blue Shirt) चर्चा पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे नेहमी 'ब्ल्यू शर्ट'चं का घालतात? असा अनेकांना प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे या प्रश्नाचे उत्तर खुद्द आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. 


शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात या निमित्ताने सभा घेत आहे. परंतु या काळात आदित्य ठाकरे यांच्या अंगात असलेल्या शर्टचा कलर काही बदलत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे नेहमी 'ब्ल्यू शर्ट'चं का घालतात? असा प्रश्नच पत्रकारांनी थेट त्यांना विचारला. तर कुणाच्या आवडीचा कलर आहे का? कुणी सांगितले म्हणून हा कलर आवडतो का? असे प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे लाजले. त्यानंतर उत्तर देताना म्हणाले की, मला हा कलर खूप आवडतो. कुणी सांगितले म्हणून घातला असे मनात आणू नका, माझं टेन्शन वाढवू नका...आवडीचं असल्याने खूप वर्षांपासून घालतो. कधी पांढरा तर कधी निळा असा शर्ट घालत असतो असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर...


दरम्यान औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी, पैठणच्या बिडकीन, पाटोदा आणि खुलताबाद येथील नंद्राबाद येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या शिंदे गटाच्या आमदारांवर देखील टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीमधून निवडणूक लढवून दाखवण्याचे मी त्यांना आवाहन दिले होते. मात्र आता त्यांनी वरळी सोडा राजीनामा देऊन त्यांच्या ठाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावं असे आवाहन त्यांना देत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तर लवकरच हे सरकार कोसळणार आहे. 40 गद्दार आमदार बाद होणार असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त...


आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावच्या सभेत गोंधळ झाला होता. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून, आदित्य यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बिडकीन येथील सभेत तब्बल 25 अधिकारी आणि 200 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aaditya Thackeray: 'भुमरेंची किती आहेत? मी ऐकलं बारा आहेत...', आदित्य ठाकरे म्हणाले