Aurangabad Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा थैमान (China Covid Outbreak) पाहायला मिळत असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान चीनमध्ये एकाच दिवसात 3.7 कोटी कोरोना रुग्णांची भर (Corona patients increased) पडल्याच्या एका अहवालाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारतात देखील आरोग्य यंत्रणा अलर्ट (Health Department Alert) झाली आहे. याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली असून, कोरोना चाचण्या (Corona Test) वाढवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांनी पत्र काढले आहे.


चीनसह जगभरातील इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभाग देखील कोरोनाच्या दृष्टीने कामाला लागला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने कोरोना चाचण्याचे प्रमाण देखील कमी झाले होते. मात्र चीन आणि इतर देशातील परिस्थिती पाहता केंद्राकडून काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची याबाबत बैठक झाली आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहे. 


काय आहे आदेश...


जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,आयुर्वेदिक दवाखाने, युनानी दवाखाने, फिरते आरोग्य पथक यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक पत्र पाठवले आहेत. ज्यात म्हटले आहे की, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि आमेरिका या देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात पसरले आहेत. त्यामुळे आपल्याकडील संभाव्य रुग्णवाढीची शक्यता लक्षात घेता पूर्व तयारी व प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून अँटीजेन, आरटीपीसीआर मोठया प्रमाणावर होणे अपेक्षीत आहे. सद्यस्थितीत कोविड चाचण्यांची आकडेवारी प्रतिदिन सुमारे 20 ते 25 असून ही चाचण्यांची आकडेवारी असमाधानकारक असल्याने सदर कामामध्ये प्रगतीकारक बदल होणे आवश्यक असल्याच शेळके यांनी म्हटले आहे.


दिवसाला 50 चाचण्या कराच...


तर वरील सर्व बाब लक्षात घेता, दैनंदिन कोविड-19 चाचण्यांची आकडेवारी ग्रामीण स्तरावर प्रतिदिन किमान 50 अँटीजेन,आरटीपीसीआर आणि पीएचसी चाचण्या (Test) चे उद्दष्टे ठेवून चाचण्यांचे प्रमाण वाढविणे अपेक्षित आहेत. त्यामुळे दिवसाला 50 अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी व त्या बाबतचा दैनंदिन अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले आहे.


Aurangabad Corona Update: हर्सूल कारागृहातील कैदी कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा सतर्क