Aurangabad:चांगला-वाईट कसाही असला तरी इतिहास आहे; त्यामुळे औरंगाबदचं नाव बदलू देणार नाही: जलील
Aurangabad Renamed: शिवसेना-भाजपची सत्ता असतांना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही: इम्तियाज जलील
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात एमआयएमने आज रस्त्यावर उतरून भव्य असा मोर्चा काढला. भरपावसात भडकलगेट पासून निघालेला मोर्चा आमखास मैदानावर जाऊन थांबला. त्यांनतर झालेल्या भाषणातून खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसह भाजपवर निशाणा साधला. तर चांगला- वाईट कसाही असला तरी इतिहास आहे, त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून हा इतिहास बदलू देणार नसल्याचं जलील म्हणाले आहे.
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, तीस वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनी शहराचे नाव बदला म्हणून सांगितले, त्यामुळे या शहराचे नाव बदलता येणार नाही. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी याच मुद्यावरून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा निर्णय हा छत्रपती संभाजीमहाराज यांच्या प्रेमापोटी नाही तर, खुर्ची हलायला लागली म्हणून घेण्यात आला. फडणवीस म्हणतात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय अवैध असून, आता आम्ही निर्णय घेऊत. मग भाजप-शिवसेनेची सत्ता असतांना का नामांतराचा निर्णय घेण्यात आला नाही, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. त्यामुळे चांगला-वाईट कसाही असला तरी इतिहास असून, शहराचे नाव आम्ही बदलू देणार नाही असेही जलील म्हणाले.
शिवसेनेकडून उत्तर...
जलील यांच्या मोर्च्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांना उत्तर दिले आहे. मुस्लिम मते पायाखालून सरकत आहे, जशी वाळू सरकते. त्यामुळे मुस्लिम मतदारांना एकजूट ठेवण्यासाठी हे आंदोलन एमआयएमकडून करण्यात आले. वर्षभरापूर्वी सुपर संभाजीनगर आम्ही म्हणत होतो तेंव्हा का हरकत घेतली नव्हती. भाजप-शिवसेनेचे सरकार असतांना फडणवीस यांनी निर्णय घेतला नाही. मात्र महाविकास आघाडीची सरकार असतांना निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांची दहा-बारा वार्डात तुटपुंजी ताकत आहे, त्यांनी आम्हाला ललकारल्यास त्याला ललकारण्याची ताकत शिवसेनेत असल्याच दानवे म्हणाले.
औरंगजेबचा एवढा पुळका का?
कोणत्याही गोष्टीला विरोध होत असतो, परंतु हा विरोध क्रूरकर्मा ज्याने संभाजीराजे यांचा हालहाल करून वध केला, याच्यासाठी होऊ नयेत अशी अपेक्षा आहे. मात्र ही अपेक्षा एमआयएमने फोल ठरवल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर असल्याने एमआयएमकडून मुस्लीम समजाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. पण एमआयएमला औरंगजेबचा एवढा पुळका का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.