Maharashtra Cabinet Expansion: तब्बल40 दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिला आहे. औरंगाबादमध्ये आता पाच मंत्री झाले असून, जिल्ह्याचे 'अच्छे दिन' बघायला मिळेल अशी अपेक्षा असल्याचं जलील म्हणाले आहे. तर सर्व नवीन मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा असल्याच सुद्धा जलील म्हणाले आहे. 


राज्यात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रतिक्रीया देतांना ट्वीट करत जलील म्हणाले की, आता औरंगाबादला पाच मंत्री आहेत. डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे 2 केंद्रीय मंत्री आहेत. राज्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे हे तीन राज्य कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांकडून माझ्या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल अशी आशा करूया. माझ्या जिल्हयाला 'अच्छे दिन' बघायला मिळेल अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. हा अनुशेष दूर करण्याचा औरंगाबादचा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. सर्व नवीन मंत्र्यांना आमच्या शुभेच्छा, असे जलील म्हणाले आहेत. 


 






शहराच्या विकासात भर पडणार...


मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला आता एकाचवेळी पाच मंत्रीपद मिळाले आहेत. ज्यात दोन केंद्रीय राज्यमंत्री आणि दोन राज्य कॅबिनेट मंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला आहे. त्यामुळे आशियातील खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचीच राज्यात सत्ता असल्याने याचा मोठा फायदा शहराच्या विकासासाठी होणार असल्याचं बोलले जात आहे. 


औरंगाबादला मिळाले पाच मंत्री...



  • डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री 

  • रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री 

  • संदिपान भुमरे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र 

  • अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र 

  • अतुल सावे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र