Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला असून, ज्यात अनेक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. याचवेळी सिल्लोड मतदारसंघाचे अब्दुल सत्तार यांना शेवटच्या क्षणी संधी देण्यात आली आहे. सत्तार यांच्या मुलांचे टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना डावलण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेर त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. 


असा आहे राजकीय प्रवास...



  • 2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.

  • 2014 महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले.

  • 2019 महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आले.

  • 2019 मध्ये ठाकरे सरकारमध्ये महसूल, ग्रामीण विकास, बंदरे, खार जमीन विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री म्हणून नियुक्ती

  • 2020 मध्ये धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. 

  • 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभाग.

  • 2022 मध्ये आता पुन्हा त्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


आणि काँग्रेसची साथ सोडली...


स्थानिक निवडणुकीत काँग्रेसने पाठींबा दिला नसल्याचा आरोप करत 2016 मध्ये पहिल्यांदा सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर पक्षातील नेत्यांसोबत पटत नसल्याने त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेत सत्तार सहभागी सुद्धा झाले. मात्र स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध पाहता फडणवीस यांनीं त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे सत्तार यांनी शिवबंधन बांधत भगवा हातात घेतला. महाविकास आघाडीत त्यांना राज्यमंत्री पद सुद्धा मिळाले. मात्र पुढे शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात ते सहभागी झाले.