Aurangabad News: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा नामांतराच्या प्रस्तावाला शिंदे-फडणवीस सरकराने पुन्हा एकदा मंजुरी दिली आहे. त्यांच्या या निर्णयावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असतांना, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा प्रतिक्रीया दिली आहे. राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला जात असल्याची टीका जलील यांनी सरकारवर केली आहे. 


शिंदे सरकराने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयावर पहिल्यांदाचा प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, शिवसेना असो की भाजप सर्वांनीच राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला आहे. औरंगाबादचे नामांतर करून छत्रपती संभाजींचं नाव देण्याची घोषणा त्याचाच एक उदाहरण आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय हवे होते, अशी टीका जलील यांनी केली. 




 


औरंगाबादला विकासाची गरज


तर पुढे बोलतांना जलील म्हणाले की, आता हे पक्ष औरंगाबादच्या जनतेला दर आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार याबाबत सांगू शकतील का?, आता तरुणांना नोकऱ्या कधी मिळतील?, तसेच हे पक्ष आमचे क्रीडा विद्यापीठही परत आणतील का?, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल?, आमचे पासपोर्ट, आधार, पॅन, शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी कुणाकडून शुल्क आकारले जाईल हेही सरकार सांगितले पाहिजे. त्यामुळे आज रस्त्यावर नाचणारे हे सगळे लोकं रांगेत उभे राहून सर्वसामान्यांची कामे करून देतील का?, औरंगाबादला फक्त नावाची नाही तर विकासाची गरज असल्याची टीका जलील यांनी यावेळी केली. 


आणखी महत्वाच्या बातम्या...


पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय


Aurangabad: शिंदे सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयानंतर भाजपकडून जल्लोष