Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार काही क्षणात सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यावर आता खुद्द संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज नाराज होण्याचे कोणतेही कारण नसून, आम्ही शिंदे यांच्यासोबत असून त्यांची भूमिका आम्हाला मान्य असल्याच शिरसाट म्हणाले आहे. 


भाजप-शिवसेना युती असल्याने मंत्रीमंडळ विस्तार करतांना काही अडचणी येत असतात. त्याप्रमाणे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात होणाऱ्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी अनेकांचा समावेश होणार आहे. त्यामुळे आज नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमची बैठक घेत्कली असून, त्यांची भूमिका समजवून सांगितली आहे. तसेच आमची भूमिका सुद्धा समजवून घेतली आहे. त्यामुळे नाराजीचा कोणताही प्रश्न नाही.


 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: शेवटच्या क्षणी अब्दुल सत्तारांची एंट्री; शिंदे गटाकडून घेणार मंत्रीपदाची शपथ


Maharashtra Cabinet Expansion : फुल अॅन्ड फायनल! शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची फायनल यादी; कुणाचा पत्ता कट, कुणाची वर्णी?