Aurangabad: अवघ्या काही मिनटात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार सोहळ्याला सुरवात होणार आहे. यावेळी एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहे. मात्र मंत्री पदाच्या यादीतून गायब झालेल्या अब्दुल सत्तार यांचे नाव ऐनवेळी आले आहे. त्यामुळे सत्तार सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर राजभवनात लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर सत्तार यांचे नाव सुद्धा टाकण्यात आले आहे.
अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव टीईटी घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आल्याची चर्चा होती. तसेच त्यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात होते. मात्र अचानक शेवटच्या क्षणी सत्तार यांच्या नावाला ग्रीन सिग्नल देण्यात आले आहे. त्यामुळे आता सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांची फायनल यादी एबीपी माझाच्या हाती
शिंदे गटातील मंत्री
तानाजी सावंत (Tanaji Sawant)
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
भाजपकडून मंत्री
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा