Rain Update: सलग चौथ्यावर्षी मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाल्याने विभागातील 253 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे अंदाजे सुमारे 5 हजार 60 गावांच्या हद्दीत जोरदार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर अतिवृष्टीमुळे यावेळीही शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.खरीप हंगामातील पिकांची दाणादाण उडाली असून, बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

यावर्षीचा 1 जून ते 20 सप्टेंबर 2022 पर्यंत मराठवाड्यातील 450 मंडळांपैकी 253  मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस नोंदविला गेला आहे. तर मराठवाड्यात 679  मिलीमीटरच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत 739 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. टक्केवारीचा विचार केल्यास आतापर्यंत 108  टक्के पाऊस झाला असून 8 टक्के अधिक पाऊस मराठवाड्यात बरसला आहे.

मंडळातील अतिवृष्टी आकडेवारी 

किती मंडळात  कितीवेळा अतिवृष्टी
मराठवाड्यातील 127 मंडळात  एक वेळा अतिवृष्टी झाली 
मराठवाड्यातील 64 मंडळात  दोन वेळा अतिवृष्टी झाली
मराठवाड्यातील 37 मंडळात  तीन वेळा अतिवृष्टी झाली
मराठवाड्यातील 16 मंडळात  चार वेळा अतिवृष्टी झाली
मराठवाड्यातील 03 मंडळात  पाच वेळा अतिवृष्टी झाली
मराठवाड्यातील 06 मंडळात  सहा वेळा अतिवृष्टी झाली

कोणत्या जिल्ह्यात किती मंडळात अतिवृष्टी...

जिल्हा  अतिवृष्टी मंडळे 
औरंगाबाद   24
जालना  23
बीड  19
लातूर  29
उस्मानाबाद  19
नांदेड  84
परभणी  25
हिंगोली 26
एकूण  253