Aurangabad News: टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून, औरंगाबाद खंडपीठाने या शिक्षकांचे वेतन थांबू नयेत असे आदेश दिले आहे. वेतन वाढ थांबू शकता, पण वेतन थांबू नका असे म्हणत न्यायालयाने या शिक्षकांना दिलास दिला आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने शिक्षकांचे वेतन थांबवता येणार नाही असं म्हणत, या महिन्यापासून शिक्षकांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहे. मात्र हा निर्णय फक्त याचिकाकर्ता शिक्षकांसाठी असल्याचही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 


याबाबत याचिकाकर्ते शिक्षकांचे वकील संभाजी टोपे यांनी माहिती देतांना म्हटले आहे की, औरंगाबाद येथील शिक्षकांच्या याचिका आज औरंगाबाद खंडपीठात निकाली निघाल्या. यावेळी झालेल्या सुनावणीवेळी, याचिकाकर्ते शिक्षकांचे वेतन थांबवणे म्हणजे त्यांच्या कुटुंबावर सुद्धा अन्यायकारक होईल असे न्यायालयाने म्हटले आहे. तर आज पहिलीच सुनावणी असल्याने सरकरी वकिलांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


पगार थांबवणे अन्यायकारक... 


शिक्षण विभागाने शिक्षकांचे पगार थांबवण्याच्या निर्णयावर न्यायालयात आज सुनावणी झाली. सद्या सणासुदीचा काळ आहे, दिवाळी तोंडावर असल्याचे लक्षात घेत, न्यायालयाने शिक्षकांचे वेतन थांबवणे म्हणजेच त्यांच्या कुटुंबावर सुद्धा अन्यायकारक राहील असे म्हटले आहे. त्यामुळे पुढील तारखेपर्यंत शिक्षकांची सेवा समाप्तीचा निर्णय घेऊन नयेत, त्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे सद्याच्या महिन्यापासून सुरु करावे असे आदेश दिले. सोबतच या शिक्षकांवर कारवाई करायची असेल तर त्यांची वार्षिक वेतन वाढ पुढच्या आदेशापर्यंत थांबवावे असेही न्यायालयाने म्हटले आहे. 


शिक्षकांना मोठा दिलासा... 


टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी शिक्षक विभागाने काढले होते. त्यामुळे काही शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठाने धाव घेत शिक्षण विभागाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने शिक्षकांचे वेतन थांबवणे त्यांच्या कुटुंबावर अन्यायकारक असल्याचं म्हणत पगार सुरु करण्याचे आदेश दिले. त्यामुळे याचिकाकर्ते शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


घोटाळ्यात अधिकारी आणि नेत्यांच्या मुलांची नावं...


राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या मुलांची सुद्धा नावं समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नाव या घोटाळ्यात आले होते. तर औरंगाबादचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्या मुलीचे सुद्धा या घोटाळ्याच्या यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. 


महत्वाच्या बातम्या... 


Aurangabad: भुमरेंनी 'उजूक' मंत्री व्हावं, पण...; राष्ट्रवादी-काँग्रेसकडून पैठणमध्ये जोरदार निदर्शने


Aurangabad: उसने घेतलेल्या पैश्यांच्या बदल्यात महिलेवर बळजबरीने अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI