5 G In Aurangabad: औरंगाबाद दौऱ्यावर आलेले केंद्रीय कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw) यांनी औरंगाबादकरांना गुड न्यूज दिली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत 200  शहरांमध्ये फाईव्ह-जी सेवा देण्याचे नियोजन असून, या टप्प्यात औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांचे फाईव्ह-जीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 


दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली  आहे. दरम्यान डिसेंबर 2023 पर्यंत जिओ 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितलं होतं. दरम्यान येत्या 31 मार्चपर्यंत 200  शहरांमध्ये फाईव्ह-जी सेवा देण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश असणार आहे. 


औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख...


औरंगाबाद येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि अँग्रिकल्चर (सीएमआयए) तर्फे आयोजित 'डेस्टिनेशन मराठवाडा' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वैष्णव बोलत होते. फाईव्ह जीसंदर्भात घोषणा करताना वैष्णव यांनी औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा शब्द उच्चारताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहायला मिळाली. 


औरंगाबादला पीट लाइन...


गेल्या 10 वर्षांपासून औरंगाबादमध्ये पीटलाइनची करण्याची मागणी होत असताना, या मागणीला अखेर यश मिळाले आहे. कारण सोमवारी अखेर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांचे हस्ते पिटलाईनचे भुमिपुजन करण्यात आले आहे. औरंगाबादेत 16  बोगींच्या पीटलाइनसाठी 29 कोटी 94 लाख 26 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. त्याच कामाचे अखेर नारळ फुटले असून, याचा औरंगाबादला मोठा फायदा होणार आहे. सोबतच जालन्यात सुद्धा 100 कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईनच्या कामाला सुरवात झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


PIT Line: औरंगाबादकरांची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमिपूजन


मोठी बातमी! औरंगाबादमध्ये जुगार अड्यावर पोलिसांची कारवाई, पाच लक्झरी कारसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल