Dasra Melava 2022 : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच, आता मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. त्यातच दोन्ही गटाकडून आपल्या नेत्याला पक्षातील कुणाची किती ताकद आहे याचं शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान औरंगाबादमधील सुद्धा दोन्ही गटाकडून मुंबईत गर्दी जमवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. तर शिंदे गटाचे नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय आणि खाजगी असे एकूण 500 बसची बुकिंग केली असल्याचा दावा केला आहे.
दसरा मेळाव्यांना गर्दी जमवण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटांची चढाओढ लागली आहे. याची तयारी शिंदे गटाने केली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते मुंबईला घेऊन जाण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथून 400 बसची बुकिंग केली असून यात औरंगाबाद विभागातील 250 तर जालना व अहमदनगर विभागातून प्रत्येकी 75 बस बुकिंग केल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या बस 4 ऑक्टोबररोजी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून रवाना होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्रथेप्रमाणे मुंबईत 5 ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र यावेळी शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा सुद्धा मुंबईतच होणार आहे. प्रथमच मुंबईत शिंदे गटाचा मेळावा होत असल्याने औरंगाबादचे शिंदे गटाचे नेते कामाला लागले आहे. सत्तार यांनी औरंगाबाद विभाग नियंत्रकांकडे 750 बसची मागणी केली होती. परंतु त्यांना 400 बस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखी 100 खाजगी बसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेनाही लागली कामाला...
शिंदे गटाप्रमाणे शिवसेनेचे नेते सुद्धा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या बैठका घेत आहे. दसरा मेळाव्याला जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले जात आहे. खुद्द विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्ह्यातील पक्षातील सर्वच नेत्यांशी संपर्क करत असून, बैठका घेत आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईत होणारा दोन्ही पक्षाचा दसरा मेळावा चर्चेत आला आहे.
महत्वाच्या बातम्या...
Dasara Melava : मुंबईचे डबेवाले कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार? ठाकरेंच्या की शिंदेंच्या?