Marathwada Liberation Day: दरवर्षी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. त्यामुळे यावर्षी सुद्धा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मुक्ती संग्राम दिन साजरा करत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आठ वेगवेगळ्या मंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले, त्याचप्रमाणे मराठवाड्याला निझामांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावर्षीचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष होता. 


कोणत्या जिल्ह्यात कुणी केलं ध्वजारोहण... 



  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आज सकाळी नांदेड येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभाजवळ ध्वजारोहण केले आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.

  • मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिंगोली येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

  • लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

  • परभणी येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राजगोपालचारी हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

  • बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न.

  • सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उस्मानाबाद येथील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली. तसेच यावेळी सावंत यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

  • जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते  झाले. 


महत्वाच्या बातम्या... 


मुक्तिसंग्राम दिनाचा कार्यक्रम अन् राजकारण; मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील काय घोषणा?


Hyderabad Liberation Day 2022 Live: आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन, पाहा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी