Marathwada Rain Update: गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. विभागातील जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरु केली आहेत.
'या' जिल्ह्यात नुकसान...
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून, 3 लाख 30 हजार 357 शेतकऱ्यांचे अंदाजे 3 लाख 20 हजार 879 हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर 261 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. हिंगोली जिल्ह्यात 19 हजार 197 शेतकऱ्यांचे 15 हजार 944 हेक्टरचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात1500 शेतकऱ्यांचे 1200 हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात 377 शेतकऱ्यांचे 50 हेक्टरचे नुकसान झाले असून, 205 हेक्टर खरडून गेली आहे.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमान...
जिल्हा | अपेक्षित | प्रत्यक्षात | टक्केवारी |
औरंगाबाद | 208.7 मिमी | 272.4 मिमी | 130.52 टक्के |
जालना | 223.9 मिमी | 331.8 मिमी | 148.19 टक्के |
बीड | 198.4 मिमी | 308.7 मिमी | 155.59 टक्के |
लातूर | 237.9 मिमी | 352.8 मिमी | 148.30 टक्के |
उस्मानाबाद | 202.1 मिमी | 290.3 मिमी | 143.64 टक्के |
नांदेड | 289.4 मिमी | 591.6 मिमी | 204.42 टक्के |
परभणी | 265.5 मिमी | 367.2 मिमी | 138.31 टक्के |
हिंगोली | 295.4 मिमी | 477.7 मिमी | 161.71 टक्के |
एकूण | 226.1 मिमी | 384.2 मिमी | 162.77 टक्के |