SSC HSC Exam: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीच्या परीक्षा 2 मार्चपासून सुरु होत आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहे. तर दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात पार पडावी यादृष्टिने पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेतली जाणार असल्याचा निर्णय झाला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पांडेय म्हणाले की, कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सर्व संबंधीत परीक्षा केंद्र संचालकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सीसीटीव्हीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या-त्या परीक्षा केंद्रावर व्हायला हवा. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आल्यावर अधिक आश्वासक वातावरण देण्याचा त्या-त्या परीक्षा केंद्राने प्रयत्न केला पाहिजे, असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे
- औरंगाबाद जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 157 परीक्षा केंद्रावर 60 हजार 425 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
- तर दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 227 परीक्षा केंद्रावर 64 हजार 919 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
- परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश नसणार.
- परीक्षा केंद्रावर कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आलेले आहेत.
- 100 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर प्रवेश करण्याच्यावेळी झडती घेण्यात येणार आहे.
- पोलीस पाटील, कोतवाल व शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी व अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेंच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करण्यात येणार आहे.
- सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथके परीक्षा आधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तर पत्रिका ताब्यात घेई पर्यंत) उपस्थित राहतील.
- शिक्षण विभागाची 06 भरारी पथके परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहेत.
- महसूल विभागाची 10 पथके परीक्षा केंद्रावर भेटी देण्यासाठी स्थापन केलेली आहे.
- मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुका निहाय संपर्क अधिकारी म्हणून खाते प्रमुखांच्या नेमणुका केलेल्या आहेत.
- परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेटी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
परीक्षा आकडेवारी!
- बारावी परीक्षा - कालावधी 21 फेब्रुवारी ते 21 मार्च
- परीक्षा केंद्रांची संख्या -157
- परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी संख्या -60425
- परीक्षकांची संख्या -21
- दहावी परीक्षा कालावधी 2 मार्च ते 25 मार्च
- परीक्षा केंद्राची संख्या -227
- परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी संख्या -64919
- परीक्षकांची संख्या -21
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI