SSC HSC Exam : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.
याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती आणि त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत
या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत. त्यानुसार आता, निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.
सकाळच्या सत्रातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या वेळेत पुढील प्रमाणे बदल:
> परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2
- परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 2:10 वाजेपर्यंत
> परीक्षेची सध्याची वेळ सकाळी- 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत
- परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:10 वाजेपर्यत
> परीक्षेची सध्याची वेळ -सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत
- सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:40 वाजेपर्यंत
दुपारच्या सत्रामध्ये सुधारित वेळापत्रक
> परीक्षेची सध्याची वेळ -दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
- सुधारित वेळ दुपारी तीन ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत
> परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत
- सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत
> परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत
- सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा
मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यामुळे कॉपी बहाद्दरावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश घेण्यात काढण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI