Aurangabad Rain Update: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प 100 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आले आहे. धरणाच्या पाच पैकी एक दरवाजा 10 सेमी उघडला असुन, त्याद्वारे 360 क्युसेक्सने पाणी शिवना नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवना नदी काठावरील लोकांना पुढे पुराचा धोका लक्षात घेता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 


सद्याची परिस्थिती...  (शिवना टाकळी मध्यम प्रकल्प) 



  • जोत्याची पाणी पातळी =551.80 मी.

  • पूर्ण संचय पाणी पातळी =561.80

  • प्रकल्पीय पूर्ण संचय क्षमता (द.ल.घ.मी) = 39.366  

  • प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी) = 36.499

  • आज ची पाणी पातळी =561.80 मी 

  • आज ची जल क्षमता (द.ल.घ.मी) = 39.366

  • आज चा उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी)  =  36.499

  • आज ची टक्केवारी = 100.00%%

  • सांडवा विसर्ग = (360 )   


कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प


कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून शिवना टाकळी धरण समजले जाते. शिवना टाकळी धरण कन्नड व वैजापूर तालुक्यासाठी वरदान समजले जाते. जवळपास चार हजार हेक्टरहून अधिक जमीन धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली येते. शिवना नदीवर 2006  मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे कन्नड तालुक्यापेक्षा दहा पट जास्त फायदा वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो. ज्यात कन्नड तालुक्यातील 346.49 हेक्टर, तर वैजापूर तालुक्यातील 3  हजार 722 .56 हेक्टर क्षेत्र धरणाच्या ओलिताखाली येते. 


असा आहे शिवना टाकळी प्रकल्प...



  • धरणाचे बांधकाम पूर्ण : 2005 ते 2006

  • मुक्त पाणलोट क्षेत्र : 317.36 चौरस किलोमीटर

  • एकूण जलसाठा : 39.36 दशलक्ष घनमीटर

  • मृत जलसाठा : 2.91 दशलक्ष घनमीटर

  • धरणाची लांबी : 4,580 मीटर

  • उत्सारित भागाची लांबी : 78 मीटर

  • अनुतत्सारित भागाची लांबी डावे व उजवे : प्रत्येकी 47 मीटर

  • नदीच्या तळापासून धरणाची उंची : 20.40 मीटर

  • धरणाच्या पाण्याखाली बुडणारे क्षेत्र : 364 चौरस मीटर

  • नदी तळ पातळी : 544.10 मीटर


महत्वाच्या बातम्या... 


मोठी बातमी! औरंगाबादच्या पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस; सात गावांचा संपर्क तुटला


Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सुरु, शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना