Nana Patole On Shiv Sena: शिवसेना (Shivsena) पक्ष आणि त्यांचा निवडणूक चिन्हं (Shivsena Election Symbol) कोणाचे याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) पोहचला आहे. तर यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देतांना भाजपवर निशाना साधला आहे. दुसऱ्यांचे घर तोडणं हा भाजपचा धंदा असल्याची खोचक टीका पटोले यांनी केली आहे. बीड येथील ओबीसी मेळाव्यासाठी आलेले नाना पटोल औरंगाबाद येथे विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना नाना पटोले म्हणाले की,भाजपने शिवसेनेला तोडण्याची व्यवस्था केली होती. शिवसेना तोडल्यानंतरचे जे काही चित्र आपण राज्यात पाहतोय, ते दुरून सर्व तमाशा भाजप पाहत आहे. दुसऱ्यांचे घर तोडणं हा भाजपचा धंदा होता आणि त्यात ते यशस्वी झाले आहे. त्यामुळे पाहू आता पुढे काय होते असे नाना पटोले म्हणाले.
सुप्रीम कोर्टाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
यावेळी पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, शिवसेना कुणाची हा विषय आता निवडणूक आयोगाकडे आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्याचे विधानसभा अध्यक्ष कार्यवाहीला स्थगिती देऊन टाकली आणि नवीन अध्यक्ष होऊ दिला नाही. त्याच्यानंतर जो शिवसेनेचा वाद झाला तो निवडणूक आयोगाचा विषय होता. मात्र सुप्रीम कोर्टाने तो आपल्याकडे घेऊन टाकला. हा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाकडून केले जात आहे. न्यायालयाने चिन्हाचा विषय पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवला असून, तो विषय निवडणूक आयोगाचा आहे. आमदारांना बडतर्फ करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे, हे सर्व असतांना असं करणं न्यायव्यवस्थेवरील संभ्रम निर्माण होणारे आहे. त्यामुळे हे लोकशाहीला घातक असल्याच पटोले म्हणाले.
चंद्रकांत पाटलांवर निशाना...
आई-वडिलांना शिव्या द्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिलेल्या शिव्या सहन करणार नाही असे विधान भाजप नेते चंद्रकांत पतीला यांनी केले असून, त्यावरून पटोले यांनी पाटलांवर निशाना साधला. ही कुठली संस्कृती आहे. आई-वडील आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. जन्मदात्याबद्दल अभिमान असला पाहिजे. त्यांचं रक्षण करणे आणि त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर असतात. असे विधान करणे ही कुठली हिंदू संस्कृती आहे असे पटोले म्हणाले. त्यामुळे हिंदू-हिंदू करून हिंदूची मतं घ्यायची आणि दुसरीकडे हिंदूंची संस्कृती संपवायची. सत्तेसाठी काहीपण अशातला हा भाग आहे. दिल्लीच्या तक्तावर शरणागती जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र कधीही माफ करत नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या...