Jayakwadi Dam: आशिया खंडातील सर्वात मोठं मातीच धरण असलेल्या जायकवाडी धरणातून गेल्या चार महिन्यात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असल्याने धरणाचे 10 ते 27 अशी 18 दरवाजे उघडण्यात आली आहे. सद्या जायकवाडी धरणातून 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु असून, 12 हजार 580 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणाचा पाणीसाठा 99.67 टक्के असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. 


आत्ताची परिस्थिती...



  • जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 12  हजार 580 क्युसेक 

  • जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग : 18 हजार 864  क्युसेक

  • जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा: 2163.771 दलघमी (76.40 टीएमसी)

  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी : 463.887  (मीटरमध्ये)

  • जायकवाडी धरणाची पाणी पातळी : 1521.94 (फुटात)

  • जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी: 99.67 टक्के 

  • जायकवाडी धरणाचे उघडलेले द्वार संख्या : 18 ( द्वार क्र. 10 ते 27) 


यावर्षी चौथ्यांदा दरवाजे उघडले....


यावर्षी सुरवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने 25 जुलैलाच पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले होते. 25 जुलै ते 03 ऑगस्ट या 9 दिवसांत धरणातून 10.41 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा 08 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या 19 दिवसांत 41.30  टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 04 ऑक्टोबर या 38 दिवसांत 148 टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून सोडण्यात आले. त्यामुळे यावर्षी जायकवाडी धरणात एकूण 211 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, आतापर्यंत त्यातून 156 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा 18 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Rain : राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता, मुंबईत आज 'यलो अलर्ट' जारी


Nashik Bus Fire : नाशिक येथे बसमध्ये अग्नितांडव, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 38 जण जखमी