Agriculture News: आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) आता सरकारच्या नव्या नियमावलीचा फटका बसत आहे. मराठवाड्यात (Marathwada) सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान नोव्हेंबरमध्येच या मोबदल्याची घोषणाही झाली. परंतु, मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, यासाठी शासनाने नव्या अटी-शर्ती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जानेवारीचा तिसरा आठवडा उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा झालेला नाही.
गेल्या चार वर्षांपासून सलग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी देखील जुलैमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही तीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांच्या हातून खरीप पूर्णपणे गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा नोव्हेंबरमध्येच झाली होती. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही.
नव्या नियमांचा फटका!
मराठवाड्यात सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई शासनाने 17 नोव्हेंबरला जाहीर केली. मात्र त्यानंतर मोबदला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, यासाठी शासनाने नव्या अटी-शर्ती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुन्हा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची नव्याने माहिती मागवण्यात आली. यामुळे सर्वच गोष्टीला उशीर झाला असल्याने, नुकसानभरपाईला देखील उशीर होत आहे. आता जानेवारीचा तिसरा आठवडा उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा झालेला नाही.
शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसत आहे. दरम्यान यंदाही काही वेगळं चित्र नव्हते. सुरवातीला जून महिन्यात पावसाचा जोर मध्यम होता. मात्र त्यानंतर जुलै, सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीसह सततच्या पावसाने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. विशेष म्हणजे उरल्यासुरल्या पीकांना परतीच्या पावसाने झोडून काढले. त्यामुळे यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या सरकारच्या मदतीकडे अपेक्षा लागून असतांना, त्यालाही उशीर होताना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या