Maharashtra Rain Live Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पाहा ठिकठिकाणचे अपडेट्स

येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे.  पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Update) वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2022 11:31 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Rains : येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार (Rain Update) पावसाची शक्यता आहे.  पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Update) वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज...More

आतापर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून  3.34  टीएमसी पाणी सोडले

Pune Rain: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24तासात हलक्या  स्वरूपाचा पाऊस  झाला आहे. पण घाट माथ्यावर चांगला पाऊस होत असल्याने  धरणात येणारे पाणी पुन्हा वाढले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात ]वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर  पानशेत धरण  75 टक्के भरले असून वरसगाव धरण 69 टक्के तर टेमघर धरण 59 टक्के भरले आहे. तर खडकवासला धरणातून कालव्यात 1005 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.या पावसाळ्यात आतापर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून  3.34  टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.