Aurangabad News: औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ख्रिस्ती प्रार्थना हक्क आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना सभेवर वेगवेगळे चुकीचे आक्षेप घेवून ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्याचा डाव काहीजण आखत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. तर यामुळे ख्रिश्चन समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखविल्या जात असल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला आहे. 


यावेळी बोलतांना आंदोलक म्हणाले की, औरंगाबाद येथील पारूंडी गावातील प्रार्थना सभेवर आक्षेप घेवून विनाकारण संबंधित ख्रिश्चन धर्मगुरूची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील तमाम ख्रिश्चन बांधवाच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या असून, यातुन कोणताही अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याचा भंग झालेला नाही. तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये व प्रार्थना सभा सुरळीत होवू द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. 


या आहेत मागण्या...



  • पालघर येथे ही ख्रिश्चन धर्मगुरू यांना अर्वाच्य भाषा वापरून त्यांना घेरून त्यांच्या वर दबाव टाकण्यात आला. खरे पाहता त्या परिवाराने त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी त्या धर्मगुरू व सिस्टरांना बोलविले होते.त्यामुळे संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. 

  • बुलढाणा येथिल ख्रिस्ती प्रार्थना सभा काही जणांनी उधळून लावली व त्या ठिकाणा वरिल पविञ वधस्तंभ व पाण्याची बाप्तीस्मा टाकी याचा अवमान केला आहे.  तरी संबंधिता वर कारवाई करावी.

  • ख्रिश्चन धर्मगुरू धर्मांतर करतात हा खोटा आरोप करून महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्यास आमचा विरोध आहे. कारण तसे असते तर ख्रिश्चन समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या खूप वाढली असती.


राणेंकडून विधानसभेत धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित 


एकीकडे महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्यास ख्रिश्चन महासंघाने विरोध केला आहे तर दुसरीकडे मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.  सभागृहात धर्मांतराच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडताना राणे म्हणाले की, राज्यात धर्मांतर करणारं एक मोठं रॅकेट असून, धर्मानुसार आणि जातीनुसार त्यांच रेटकार्ड ठरलेलं आहे. धर्मांतराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवलं जातं, असं नितेश राणे म्हणाले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये झालेल्या धर्मांतर प्रकरणाचा दाखलाही राणे यांनी दिला. 


महत्वाच्या बातम्या...


Burning Bike VIDEO: चालत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट, काही क्षणात जळून खाक


Aurangabad: कंटेनर चालकाची नियत फिरली, 20 लाखांच्या व्हिस्कीसह ट्रकच पळवला