Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होते. मात्र शनिवारी दिवसभराचा दौरा आटपून ते अचानक दिलील्ला रवाना झाले होते. त्यामुळे त्यांचा आजचा दौरा पूर्ण होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र आज सकाळी पहाटे पाच वाजताच शिंदे विमानाने दिल्लीहून औरंगाबादला दाखल झाल आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांचा आजचा औरंगाबाद दौरा पार पडणार आहे.
असा आहे आजचा दौरा...
रविवार 31 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत मुख्यमंत्री हे विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील पाऊस, अतिवृष्टी, पिक-पाणी व विकास कामे यांचा आढावा घेतील. त्यानंतर सकाळी 11.30 ते 12 या वेळेत पत्रकार परिषद घेतील. पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी 12 ते 12.30 पर्यंत वेळ राखीव असणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हे 12.30 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने सिल्लोडकडे रवाना होतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्लोड येथे पोहचल्यावर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सिल्लोडच्या नगर परिषदेच्या मैदानावर मुख्यमंत्री यांची 3 ते 4 वाजेच्या सुमारास जाहीर सभा पार होणार आहे. सभा झाल्यावर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होतील. औरंगाबाद शहरात आल्यावर मुख्यमंत्री वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. दरम्यान आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे आणि अतुल सावे यांच्या कार्यालयाला भेटी देऊन रात्री 11 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होतील.