Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावर असतानाच भाजपकडून मोठा दावा करण्यात आला आहे. आगमी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचा खासदार भाजपचाच असेल असे विधान भाजपचे नेते तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना युतीत सुद्धा ही जागा नेहमी सेनेकडे असते.
आगामी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून शहरातील आयएमए हॉल येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडणून आणायचा असल्याचे विधान हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. सोबतच भाजप आमदार प्रशांत बंब आणि अतुल सावे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
शिंदे गटाची अडचण वाढणार?
स्वतःला खरे शिवसैनिक म्हणणारे आणि आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाची भाजपच्या या दाव्यावर काय भूमिका असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण प्रत्येकवेळी शिवसेना-भाजप युतीत औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेकडे असते. मात्र आता भाजपकडून या जागेवर दावा करण्यात आल्याने शिंदे सेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर शिंदे सेना भाजपला ही जागा सोडणार का? हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.
भाजप-शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार?
आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी उघडपणे यापूर्वीच याची माहिती दिली आहे. मात्र आत्तापासूनचं भाजपकडून अशा महत्वाच्या जागांवर दावे केले जात असल्याने शिंदे गटाची अडचण होण्याची शक्यता आहे. तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा जागावाटपाच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गटाला पक्षातील पदाधिकारी यांच्या नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: 'मला 'संज्या' म्हणणाऱ्या खैरेंना मी 'चंद्या' म्हंटले तर..'; संजय शिरसाट यांची खोचक टीका
Aurangabad: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहलेले 42 पत्र देणार