Aurangabad: राज्यात साडे सात हजार पोलिसांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

Aurangabad: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याची बंडखोर आमदारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मोसीन शेख Last Updated: 31 Jul 2022 10:22 PM
राज्यात साडे सात हजार पोलिसांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

महाराष्ट्रात साडे सात हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.   

भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं कोण बोलतेय?: एकनाथ शिंदे

Aurangabad News: औरंगाबाद येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असून, भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं कोण बोलतेय? असे ते म्हणाले. तर माझ्यावर विश्वास ठेऊन आलेल्यामधील एकजणही म्हणाला नाही की, मी ईडीच्या धाकामुळे आलोय. आमच्या मर्जीने आलोय. आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय. शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ईडीच्या धाकाने, कोणत्याही तपास यंत्रणाच्या धाकानं कुणी येत असेल तर मला नकोय,असे शिंदे म्हणाले.

Aurangabad: अर्जुन खोतकरांचा अखेर शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश

Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या अधिकृतरीत्या शिंदे गटात प्रवेश करण्यात आला आहे. सिल्लोड येथे आयोजित जाहीर सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे, रामदास कदम, यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली.

राज्यातील सर्व मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा : अब्दुल सत्तार 

राज्यातील सर्व मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. मी मुस्लिम असून देखील एकनाथ शिंदेंसोबत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र असल्यामुळे माझ्यात आणि अर्जुन खोतर यांच्यात वाद होणार नाही, असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथील सभास्थळी दाखल

Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून ते सिल्लोड येथे पोहचले आहे. सिल्लोड येथे मुख्यमंत्री यांची सभा होणार असून, ते सभास्थळी दाखल झाले आहे. त्यामुळे या सभेतून मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडला पोहचले; कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी

Aurangabad News; औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात पोहचले आहे. यावेळी पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोठी आतिषबाजी सुद्धा यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. जेव्हा आम्ही सरकार स्थापन करताच आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेतला,पेट्रोल-डीझेल बाबत निर्णय घेतला. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

मराठवाड्यातील नुकसानभरपाई दिली जाणार आहे. एनडीआरएफच्या निकषांवर निधी दिला जाणर आहे. एकट्या मराठवाड्यासाठी वेगळा निर्णय घेतला जाणार नाही. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असून, त्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच रस्त्यांच्या कामात कोणतही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी काही निर्णय घेतले गेले आहे. तर वाहून जाणारे पाणी दुष्काळीभागात वळवण्यासाठी पप्रयत्न करण्याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. आम्हाला केंद्र सरकारची मोठी मदत होणार आहे. या राज्याच्या विकासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना राबवण्याबाबत अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहे. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने आणखी निधी देण्याचा निर्णय झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत सुद्धा काही निर्णय घेण्यात आले आहे

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

शेतकरी आत्महत्या रोखण्याबात काही निर्णय घेण्यात आले आहे. नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. पैठण येथील उद्यानाला भरीव निधी देण्यात येणार आहे: मुख्यमंत्री शिंदे 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद लाईव्ह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरु आहे.मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु आहे. मराठवाड्यातील विकास कामाबाबत अनेक निर्णय घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागीय आयुक्तालयात दाखल; नुकसानीचा आढावा घेणार

Aurangabad News: औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले असून, काही वेळेत अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीला सुरवात होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेणार आहे. तसेच त्यांनतर नुकसानभरपाईची घोषणा करण्याची शक्यता आहे. 



Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत; गणपतीच्या पूजेनी केली दौऱ्याची सुरवात

Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून, आजच्या दिवसाची सुरवात त्यांनी शहरातील संस्थान गणपतीच्या मंदिरात पूजा करून केली आहे. त्यांनतर ते शहरातील काही धर्मिक स्थळी जाऊन दर्शन घेणार आहे. तसेच मराठवाडा नुकसानीचा आढावा सुद्धा मुख्यमंत्री घेणार आहे. 

Aurangabad: मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये दाखल

Aurangabad News: दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. औरंगाबादच्या वैजापूर येथे शिंदे दाखल झाले आहे. वैजापूर येथील साखर कारखाना उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे जाहीर सभेतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.


 


 

CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव येथे नाशिक विभागीय आढावा बैठक सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दादा भुसे, सुहास कांदे मंचावर 

CM Eknath Shinde Malegaon : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव दौऱ्यावर असून नुकतीच त्यांची मालेगाव येथे जाहीर सभा पार पडली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिक विभागीय आढावा बैठक सुरु झाली आहे. असून यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत. दरम्यान राज्यपालांच्या वक्तव्यांवर मुख्यमंत्री काय भूमिक घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

CM Eknath Shinde Malegaon : मालेगाव : ऊन-वारा, पावसात पोलीस ऑन ड्युटी असतात, आपण त्यांचं देणं लागतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

CM Eknath Shinde Malegaon : राज्यातील पोलीस रस्त्यावर ऑन ड्युटी असतात. ऊन , वारा पाऊस कशाची तमा न बाळगता ते कर्तव्य बजावतात. त्यांच्यासाठी आपण काहीतरी देण लागतो. पोलिसांच्या अनेक अडचणी असतात. ते अनेक आव्हानांना तोंड देत आपले काम करता असतात. महाराष्ट्रातील नागरिकांचे जीवन सुरक्षित व्हावे, हि जबाबदारी पोलिसांकडे आहे.. मुंबईत तर 50 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी आहेत, मात्र घरांची संख्या त्याहून कमी, काही ठिकाणी तर पोलिसांच्या सगळी जुन्या वसाहती आहेत. यावर लवकरच पाऊल उचलणार असून पोलिसांसाठी घरांची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मालेंगाव दौऱ्यावर असून या ठिकाणी जाहीर सभेत ते बोलत आहेत. 

पार्श्वभूमी

Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 व 31 जुलै 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच औरंगाबाद शहरात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या याच दौऱ्यातून बंडखोर आमदारांकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. आपल्या याच दौऱ्यात बंडखोर आमदार रमेश बोरनारे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री राजकीय सभा सुद्धा घेणार आहेत. तर आमदार संदिपान भुमरे,संजय शिरसाट आणि भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाला भेटी देणार आहे.सोबतच मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीतून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सुद्धा घेणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.