Chandrakant Khaire On Sanjay Shirsat: निवडणुक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यावर पुन्हा एकदा शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) आमने-सामने आले आहेत. दरम्यान औरंगाबाद येथील शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhavan) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दावा केला आहे. त्यांच्या याच दाव्याला आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'कोण शिरसाट आणि त्यांचा औरंगाबादच्या शिवसेना भवनासाठी त्यांचे काय योगदान आहे?' असा खोचक टोला खैरे यांनी लगावला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या सर्वच गोष्टींवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यातच आज सकाळी विधिमंडळातील शिवसेना कार्यालयाचा देखील शिंदे गटाने ताबा घेतला आहे. दरम्यान, आता औरंगाबादमधील औरंगपुरा भागात उभारलेले शिवसेना भवनदेखील आमचेच असून, आगामी काळात ते ताब्यात घेणार असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट आणि शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्याला खैरे यांनी उत्तर देत, शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले खैरे?
यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, कोण शिरसाट आणि कोण जंजाळ, त्यांचा काय संबध आहे. औरंगाबाद शिवसेना भवनात त्यांचं काय योगदान आहे? शिवसेनाप्रमुख यांनी जागा ती जागा पाहिली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला होता. त्याप्रमाणे आम्ही सर्व काही केले होते. त्यावेळी मात्र याच लोकांनी काड्या केल्या होत्या. शिवसेनामध्ये असताना देखील हे काम होऊ नयेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. आज खूप कष्टांनी आम्ही इमारत बनवून घेतली आहे. तसेच एकही पैसा महानगरपालिकेचा आम्ही बुडवला नाही. महापालिकेला यामुळे खूप मोठ्याप्रमाणावर उत्पन्न देखील झाले. तसेच, शिवाई सेवा ट्रस्टची ही जागा आहे. त्यांनी आम्हाला कितीही डिवचण्याची प्रयत्न केला तरीही, आम्हाला काही फरक पडत नसल्याचं खैरे म्हणाले आहेत.
सर्व पक्षीय शासकीय कार्यालय ताब्यात घेणार
दरम्यान, मुंबईतील शिवसेना भवन आम्ही ताब्यात घेणार नसून, त्यावर आम्ही दावा देखील करणार नसल्याचा खुलासा संजय शिरसाट यांनी केला आहे. मात्र शासकीय कार्यालयात असलेले शिवसेना पक्ष कार्यालय आम्ही ताब्यात घेणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहे. सोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील व्हीप झारी केला जाणार असून, शिवसेनेच्या सर्वच आमदारांना तो लागू राहणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: