Aurangabad News: आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मकाच्या पिकांवर घोणस अळीचे संकट उभे राहिले आहे. त्यातच घोणस अळी शेतकऱ्यांना चावा घेत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, गिरसावळी आणि रांजणगाव या तीन ठिकाणी तीन शेतकऱ्याला आतापर्यंत या घोणस अळीने चावा घेतला आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने सद्या त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


पाऊस चांगला असल्याने मकाचे पिकं जोमात आहे. मात्र पीक ऐन जोमात असतांना आता घोणस अळीचे संकट उभं राहिले आहे. मकाच्या पिकांवर घोणस अळी हल्ला करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटांत सापडला आहे. विशेष म्हणजे घोणस अळी थेट शेतकऱ्यांना चावा घेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंत तीन शेतकरी यामुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना आता नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. 


यांच्यावर केला हल्ला.... 


घोणस अळीमुळे भीतीचे वातावरण असतानाच फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, रांजणगाव आणि गिरसावळी येथील शेतकऱ्यांना या अळीने चावा घेतला आहे.चावा घेतलेल्या तीनही शेतकऱ्यांवर फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार घोणस अळीच्या चाव्यानंतर शेतकऱ्यांवर उपचार योग्य वेळेत झाल्याने त्यांची प्रकृती आता चांगली आहे. पण या घटनेमुळे फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 


अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल.…..


कधीकाळी पाऊस पडत नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत सापडायचा. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जुलै महिन्यापासून जोरदार बॅटिंग करणारा पाऊस अजूनही अनेक ठिकाणी मुसळधार कोसळतोय. त्यामुळे अनेक भागात शेती पाण्याखाली आली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकं पिवळी पडत आहे. निसर्गाच्या या आसमानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच आता अशा नवनवीन कीटक पिकांवर हल्ला करत असल्याने शेतकऱ्याने अशा संकटातून कसे बाहेर पडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.  


महत्वाच्या बातमी...


Godavari Flood : गोदावरी नदीला पूर, रात्र जागून काढली; पैठणकरांना पुन्हा 2006 ची आठवण


Godavari Flood : जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा  विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना