Aurangabad: 26 सप्टेंबरपासुन नवरात्र उत्सव सुरु होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन रोडवरील अयोध्या नगरच्या कर्णपुरा येथे जत्रा भरणार आहे. यावेळी येणाऱ्या भाविकात प्रामुख्याने महिला, लहान मुले व वृध्द व्यक्ती सहभागी होत असतात. यात्रा व देवीच्या दर्शनासाठी भाविक पायी व आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येतात. तसेच विजयादशमीचे दिवशी कर्णपुरा येथील बालाजी भगवान यांची रथ यात्रा मिरवणुक सालाबादाप्रमाणे निघत असते. त्यामुळे या परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. सोबतच नागरिकांना पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे.
26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान 24 तास हे मार्ग बंद राहणार....
- लोखंडी पूल ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग.
- कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग.
- महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते पंचवटी चौक उड्डाणपुला खालील जाणारा व येणारा मार्ग.
- रेल्वेस्टेशन कडून महावीर चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग.
असे असणार पर्यायी मार्ग...
- रेल्वे स्टेशनकडून- मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी व जाणारी वाहने महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) उड्डाणपुलाचा वापर करतील.
- नाशिक- धुळेकडून येणारी व जालना- बीडकडे जाणारी वाहने ही शरणापुर फाटा- साजापुर फाटा- ए. एस. क्लब लिंक रोड महानुभव आश्रम चौक- बीड बायपास रोड या मार्गाने जातील.
- नाशिक - धुळे कडून येणारी व पैठण कडे जाणारी वाहने ही शरणापुर फाटा, साजापुर फाटा, ए. एस. क्लब लिंक रोड या मार्गाने किंवा धुळे सोलापुर हायवेने जातील.
- पुणे-नगरकडून येणारी व जालना बीडकडे जाणारी वाहने ही ए. एस. क्लब लिंक रोड-महानुभव आश्रम चौक या मार्गाने जातील.
- जालना- बीड कडून येणारी व नगर-धुळे-नाशिक कडे जाणारी वाहने ही बीड बायपास रोड-महानुभव आश्रम चौक- लिंक रोड- ए. एस. क्लब मार्गे जातील.
- कोकणवाडी चौककडुन पंचवटी चौकाकडे जाणारी वाहने रेल्वेस्टेशन किंवा क्रांतीचौक मार्गे जातील.
यात्रेची जोरदार तयारी...
तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या कर्णपुऱ्यातील जत्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे भरवता आली नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी सरकराने सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या आयोध्या मैदानात भरणारी कर्णपुऱ्याची जत्रेची जोरदार तयारी सुरु आहे. मैदानात पाळणे आणि इतर दुकाने यायला सुरवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad Crime News: हॉटेलवर बसून 'चपटी' घेणाऱ्यांची अशी उतरली 'झिंग'; न्यायालयाने थेट...
Aurangabad News: दुकानात बिस्किट घेण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल