Aurangabad News: जी 20 (G-20) परिषदेच्या निमित्ताने सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम 22 फेब्रुवारीच्या आत पूर्ण करून घ्यावे असे निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. G-20 निमित्त सुरू असलेल्या कामांचा सखोल आढावा त्यांनी आज सकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात (Smart City Office) आयोजित एका आढावा बैठकीत घेतला. आढावा घेत असताना त्यांनी काही सूचना देखील केल्या.
अभिजीत चौधरी यांनी यावेळी निर्देश दिले की, G-20 निमित्त सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरणाचे काम कालमर्यादेत करत असताना, संबंधित अभियंतांनी कामाच्या गुणवत्तोवर लक्ष द्यावे. घाईघाईत गुणवत्तेवर दुर्लक्ष करणे चुकीचे होईल. तसेच शहरातील सर्व वाहतूक बेट यांची किरकोळ दुरुस्ती आणि रंगोटी करण्यात यावी. तसेच शहरातील लावण्यात आलेल्या अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स उद्यापासून मोहीम राबवून तात्काळ काढण्याची सुरुवात संबंधित विभागाने करण्याचा सूचनादेखील, अभिजीत चौधरी यांनी केल्या. तसेच भंगार पडलेले वाहनेदेखील उचलण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
प्रशासकांनी वॉर्डनिहाय आढावा घेतला.
ज्या रस्त्यांवर G-20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांची ये-जा राहणार आहे, त्या रस्त्यांवरचे सुशोभीकरणाचे काम 22 फेब्रुवारीच्या आत संपूर्ण करून घ्यावे असे निर्देश आयुक्तांनी दिली. याशिवाय शहरातील स्कायवॉक (फूट ओव्हर ब्रिज) यांची रंगरंगोटी करून त्यांच्यावर रोषणाई करावी, असे निर्देश देखील त्यांनी या बैठकीत त्यांनी दिले. तसेच सदरील बैठकीत चौधरी यांनी रस्त्यांवरचे सौंदर्यकरण व सुशोभीकरणचे काम, मकबरा परिसर स्वच्छ करणे, दुभाजक वाहतूक बेट आणि भिंतीचे सुशोभीकरण, हेरिटेज टूर इत्यादी कामांच्या वॉर्ड निहाय आढावा घेतला.
बैठकीत यांची उपस्थिती...
सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता एबी देशमुख, उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, उप आयुक्त राहुल सूर्यवंशी, स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, कार्यकारी अभियंता बि डी फड, डी के पंडित, राजू संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील तसेच सर्व वॉर्डांचे सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड अभियंता, पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आदींची उपस्थिती होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! तृतीयपंथीयाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या; औरंगाबादेतील घटना