Aurangabad News: कोणी कार देतो का, कार असे म्हणण्याची वेळ औरंगाबाद पोलिसांवर आली आहे. त्याचं कारण म्हणजे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तीन कॅबिनेट, दोन केंद्रीय मंत्री आणि एक विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना पुरवली जाणारी डीव्ही कार उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांची धावपळ उडत आहे. एकाचवेळी पाच-सहा डीव्ही कार उपलब्ध करून देतांना पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे. 


मंत्र्याचा ताफा म्हणजे पुढे सायरन वाजत जाणारी एस्कॉर्टचा ताफा आणि त्यामागे सरकारी वाहन म्हणजेच डीव्ही कारमध्ये बसलेले मंत्री महोदय असे चित्र अनकेदा आपल्याला पाहायला मिळतो. पण औरंगाबाद जिल्ह्यात एकाचवेळी एवढे मंत्री झाले आहे की, त्यांना सरकारी वाहणं उपलब्ध करून देतांना पोलिसांची धावपळ उडत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातून गाड्यांची पळवापळवी सुरु आहे. कधी जालना जिल्ह्यातून तर कधी बीडमधून सरकारी गाड्या मागवल्या जातायत. 


औरंगाबाद जिल्ह्यातील किती मंत्री आहेत पाहू यात...



  • संदिपान भुमरे, रोहयो मंत्री तथा पालकमंत्री

  • अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

  • अतुल सावे, सहकार मंत्री 

  • भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री  

  • रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

  • अंबादास दानवे,विरोधी पक्षनेते 


अब्दुल सत्तारांचा जुगाड...


एकाचवेळी जिल्ह्यात पाच मंत्री आणि एक विरोधी पक्षनेते असल्याने मंत्र्यांना शासकीय वाहणं उपलब्ध होत नाही. त्यामुळे यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शक्कल लढवत जुगाड केला आहे. स्वतःच्याच गाड्यांवर मोठ्या अक्षरात मंत्री नाव लिहून त्याचा ते वापर करत आहे. अब्दुल सत्तार यांनी आपल्या ताफ्यात अशा दोन स्कॉर्पिओ ठेवल्या असून, त्याच्यावर मंत्री नाव लिहून त्याचा वापर करतात.  


राजशिष्टाचार विभागाची गाड्यांसाठी धावपळ 


केवळ शहरातीलच मंत्रीच नाही तर इतरही मंत्री दौऱ्याच्या निमित्ताने शहरात येतात. अनेकदा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती येत असतात. तर राजशिष्टाचार विभागाकडे 4  इनोव्हा, 4  स्कोडा आहेत. मात्र जिल्ह्यात राजशिष्टाचाराच्या नियमात बसणाऱ्या व्यक्तींची संख्या अर्धा डझन झाली आहे. त्यामुळे त्यांना डीव्ही कार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाला इतर जिल्ह्यांतील कार मिळण्यासाठी वणवण करावी लागते आहे.


महत्वाच्या बातम्या...


सत्तार म्हणाले, एक दिवस शेतकऱ्यांसोबत..,तुमच्या गावात कोणी आलं का?; खालून उत्तर आलं, अजिबात नाही!


Raosaheb Danve: 489 कोटींच्या रस्त्याचं काम अवघ्या 289 कोटींमध्ये होणार? रावसाहेब दानवेंच्या भावाला औरंगाबाद-पैठण रस्त्याचं टेंडर