Aurangabad Fake Baba exposed : औरंगाबाद जिल्ह्यातील पारुंडी गावातील भोंदूबाबाची एबीपी माझाने बातमी दाखवताच प्रशासन आणि सरकार खडबडून जागं झालं आहे. तर माझाच्या बातमीनंतर भोंदूबाबावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजकीय मंडळीही आक्रमक भूमिका घेतांना पाहायला मिळत आहे. तर या बाबाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.
पोलीस पाटलावर कारवाई करा: जलील
यावर बोलतांना एमआयएमचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मला तर हे सांगायचं आहे, त्याच्यावर काही कारवाई करणार असेल तर त्याबरोबर गावातील पोलीस पाटलावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. हे सर्व संगनमताने सुरु होते. कुणाला फसवत आहे तर, जे लोकं अशिक्षित आहे, गोरगरीब लोकं आहे. डोक्यावर हात ठेवून तुम्ही बरे होत असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत असून आणखी जे काही असे लोकं असतील त्यांना सर्वांसमोर आणले पाहिजे असे जलील म्हणाले.
पोलिसांना चौकशीचे आदेश देणार: भुमरे
ज्या गावात हा सर्व प्रकार सुरु होता, त्या तालुक्याचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर अशाप्रकारे डोक्यावर हात ठेवून आजार बरे झाले असते तर, एवढी मोठमोठी रुग्णालय उघडण्याची गरज पडली नसती. त्याच्यावर होणार खर्च सुद्धा वाचला असता. मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे. तसेच याची स्वतः चौकशी करून असे प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भुमरे म्हणाले.
अन्यथा आम्हाला भूमिका घ्यावी लागेल: दानवे
पारुंडी गावातील भोंदूबाबाच्या या सर्व प्रकरणावर प्रतिक्रीया देतांना शिवसेना आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणाला पॅरीलेसेस,कुणला हृदयविकाराचा झटका आला,कुणाची किडनी खराब झाली अशा आजारांवर फक्त डोक्यावर हात ठेवून बरे करण्याचा दावा चुकीचा आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. निश्चितपणे यातून एक सर्वसामान्य जनतेचं मानसिक समाधान होत असेल, मात्र यातून मोठ्याप्रमाणावर आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे दावे करणं चुकीचे आहे. तसेच प्रशासनाने या बाबाचा तातडीने चंबूगबाळा आवारावा अन्यथा तो आम्हाला आवरावा लागेल असा इशारा दानवे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या...
औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा
Aurangabad: पोलिसाच्या मदतीने चालतो भोंदूगिरीचा बाजार; एबीपी माझाच्या बातमीनंतर उडाली खळबळ