Samruddhi Highway Accident News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway ) नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र उद्घाटन होऊन चोवीस तास उलटत नाहीत तोच समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्यावर पहिल्या अपघाताची नोंद झाली. आता ही घटना उलटून काही तास उलटत नाही तो कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली माल वाहतूक करणारा ट्रक‌ ट्रेलर अडकल्याची घटना समोर आली. 


समृद्धी महामार्ग तयार करतांना यापूर्वी जाणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवरून पूल बनवण्यात आले आहे. त्यामुळे पुलाखालून वाहूतक करण्यात येते. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने माल वाहतूक करणारे ट्रक अडकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली माल वाहतूक करणारा ट्रक‌ ट्रेलर काल संध्याकाळच्या सुमारास अडकला. या ट्रक ट्रेलरला बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काल सायंकाळच्या सुमारास चेन्नई येथून धुळेकडे नगर-मनमाड महामार्गावरून जात असलेला ट्रक ट्रेलर समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अडकला होता. या ट्रकवर अधिक उंचीची अवजड मशिनरी असल्याने हे वाहन पुलाखाली अडकल्याच पाहायला मिळाले. अखेर आज सकाळी पोकलेंडच्या सहाय्याने ट्रकच्या खाली खड्डा करून वाहन बाहेर काढले. मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागली. 


उंची कमी असल्याने ट्रक अडकला...


नगर-मनमाड महामार्गावरून अनेक माल वाहतूक करणाऱ्या ट्रकची नेहमीच वर्दळ असते. मात्र जेव्हा समृद्धी महामार्गाचे काम झाले त्यावेळी नगर-मनमाड महामार्गावरून समृद्धीचे दोन वेगवेगळे पूल बांधण्यात आले. मात्र या पुलांची उंची सर्वसाधारण ट्रकच्या उंचीनुसार करण्यात आल्याने, अधिक उंचीचे  अवजड मशिनरी साहित्य घेऊन आल्यावर ट्रक पुलाखाली अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काही अनुभव सोमवारी एका ट्रक चालकाला आला. अखेर रस्ताच खाली करावा लागला आणि त्यानंतर अडकलेला ट्रक निघाला. 


समुद्धी महामार्गावर पहिला अपघात कारचा....


11  डिसेंबरला नागपूर ते शिर्डी असा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी या महामार्गावरून प्रवास करण्याचा आनंद वाहनचालकांनी घेतला. मात्र याचवेळी सोमवारी या महामार्गावरील पहिला अपघात देखील झाला. वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कारने जोराची धडक दिल्याने अपघात झाल. या अपघातात दोन्ही कारचं प्रचंड नुकसान झालं. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. 


Samruddhi Mahamarg: समृद्धीवरून औरंगाबाद ते नागपूर एसटी बस धावणार, 15 डिसेंबरपासून सुरवात