Aurangabad Accident News: औरंगाबादच्या (Aurangabad) पैठणमध्ये एक कार आणि दुचाकीचा जोरदार अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (22 फेबुवारी) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पैठण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचोड फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. ज्यात भरधाव वॅगनआर कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रकाश काळूजी गवळी (वय 55 वर्षे, ह.मु. राजनगर मुकुंदवाडी औरंगाबाद) व स्मसुदिन अन्सारी (वय 30 रा.मनिर मिंया पुरूहरा, हजारीबाग, झारखंड) असे मृतांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठणहून वॅगनआर (क्रमांक एमएच 20 बिएन 9114) पाचोडच्या दिशेने चालली होती. दरम्यान पाचोड फाट्यावर येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला (एमएच 20 एफटी 2985) वॅगनआर चालकाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकीस्वार जोरात मोटारसायकलसहित रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. मात्र जबर मार लागल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. यावेळी नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पैठण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचोड फाट्याजवळ व्हॅगनार कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यावेळी व्हॅगनार वेगात असल्याने तिने दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. दुचाकीस्वार जोरात गाडीसह दूर जाऊन पडल्याने कारचालक आणि त्यात बसलेल्या प्रवाशांनी मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. तर कारमधील काहींना इजा झाली असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव!
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हाळ जमादार गोपाळ पाटील, महेश माळी, भगवान धांडे, मुकुंद नाईक आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमींना उपचारासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: