Marathwada Dam Water Reservoir: दुष्काळवाडा म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षे जोरदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सोबतच शेतीच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न मिटला आहे. कारण वर्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर 78 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 80 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. तर मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात सद्या 93 टक्के पाणीसाठा झाला आहे.
मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा
अ.क्र. | धरणाचे नाव | जलसाठा |
1 | जायकवाडी धरण | 93 टक्के |
2 | निम्न दुधना धरण | 67 टक्के |
3 | येलदरी धरण | 69 टक्के |
4 | सिद्धेश्वर धरण | 75 टक्के |
5 | माजलगांव धरण | 46 टक्के |
6 | मांजरा धरण | 39 टक्के |
7 | पैनगंगा धरण | 92 टक्के |
8 | मानार धरण | 100 |
9 | निम्न तेरणा धरण | 67 |
10 | विष्णूपुरी धरण | 77 |
11 | सिनाकोळेगाव धरण | 23 |
तर ओला दुष्काळ....
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 300 कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यांनतर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यात वर्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर 78 टक्के पाऊस झाला असून, पावसाचे आणखी 53 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या काळात सरासरीच्या 22 टक्क्यांपेक्षा अधिकचा पाऊस जाल्यास ओल्या दुष्काळाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या...
Marathwada: मराठवाड्यात पावसाचा आणखी तीन दिवस मुक्काम; हवामान विभागाचा अंदाज
पुढील 4 दिवस कोकण,मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा;बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळात रुपांतराची शक्यता