Aurangabad News: उद्धव ठाकरेंच्या शिवसनेचे आणखी दोन आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या रोहियो मंत्री संदिपान भुमरे यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमच्या संपर्कात फक्त आमदारचं नाही तर मराठवाड्यातील दोन-तीन शिवसेना जिल्हाप्रमुख सोडले तर सर्वच संपर्कात असल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे. आतापर्यंत 80 टक्के जिल्हाप्रमुखांसोबत बोलणं झालं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रवेशसोहळ्याची तारीख ठरवतील असेही भुमरे म्हणाले आहे. 


यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, मी आजही सांगतो की उद्धव ठाकरे यांच्या गटातील आणखी दोन-तीन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. तसेच लवकरात-लवकर ते शिंदे गटात सहभागी होणार आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही ते कोकणातील असतील, मराठवाड्यातील असतील. तसेच आमदारांसोबतच मराठवाड्यातील एक-दोन जिल्हाप्रमुख सोडले तर जवळपास सर्वच शिंदे गटाच्या संपर्कात आहे.


मराठवाड्यातील अंदाजे 80 टक्के जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे. तर पुढे बोलतांना भुमरे म्हणाले की, शिंदे गटात येणाऱ्यांची प्रवेशसोहळ्याची काही तारीख ठरली नाही, मात्र जसेजसे येतील त्याप्रमाणे प्रवेश होतील. 


अंबादास दानवेंच्या आरोपाला उत्तर... 


माझी काही सभा वैगरे काही झाली नाही. मी सभेला गेलो नव्हतो. मी जैन मंदिर आणि नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मी कुणालाही आवाहन केले नव्हते की, तुम्ही या म्हणून, मी फक्त आणि फक्त दर्शनासाठी गेलो होतो. याचवेळी तिथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तेथून जाणार असल्याने शुभेच्छा देण्यासाठी तिथे थांबलो. कुठलाही जाहीर कार्यक्रम नव्हता. व्हिडिओमध्ये जे काही खुर्च्या दाखवण्यात आल्या आहेत, त्या माझ्या जाण्यापूर्वीच्या दाखवण्यात आल्या आहेत. मी मंत्री आहे. मंत्री असो या नसो पन्नास लोकं सुद्धा नव्हते हे बोलणं कितपत योग्य आहे. हे आपल्याला तरी पटले का?, मी कार्यालयात आलो तर दोन-चारशे लोकं असतात, मग मी पैठणला गेल्यावर पन्नास लोकं राहत नाही हे किती खोटे आरोप करायचे याला सुद्धा मर्यादा आहे. 


गणेशोत्सव झाल्यावर मुख्यमंत्र्यांची पैठणमध्ये सभा 


अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की,माझ्या सभेला पन्नास लोकं सुद्धा नव्हते. पण आता गणेशोत्सव झाल्यावर दोन-तीन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा राहणार असून, त्यावेळी त्यांना दिसेल पैठण तालुका कुणाच्या पाठीशी आहे. पैठणमध्ये होणारी मुख्यमंत्री यांची सभा गेल्या तीस वर्षात न भूतो न भविष्यती अशी सभा झाली अशी होईल असेही भुमरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या...


मोठी बातमी: उद्धवसेनेचे दोन आमदार फुटणार; रोहयो मंत्री संदिपान भुमरेंचा दावा


Shahajibapu Patil: भुमरेंच्या सभेला खुर्च्या खाली, शहाजीबापू म्हणतात रोजचं पन्नास हजार लोकं जमा करायची का?