Marathwada Teachers Constituency: राज्यातील पाच वेगवेगळ्या शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी (Marathwada Teacher Constituency Election) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 227 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण 14 उमेदवार निवडणूक (Election) रिंगणात असून, 61 हजार 529 मतदारांना मत देण्याचा अधिकार आहे. तर 2 फेब्रुवारीला औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार आहे. 


औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी, भाजपसह एकूण 14 उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू होता. आज प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. ज्यात 227 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. 


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत औरंगाबादमध्ये 53, जालन्यात 15, परभणीत 18, हिंगोलीत 12, नांदेडमध्ये 30, बीडमध्ये 34, लातूरमध्ये 40, उस्मानाबादमध्ये 25 अशी एकूण 227 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रावर अखंडितपणे व्हिडीओग्राफी आणि वेबकास्टिंग केले जाणार आहे. पसंतीक्रमानुसार, मतदान करण्याची मुभा मतदारांना आहे. मतमोजणीच्या वेळी उमेदवाराच्या मतांची सरमिसळ करून मतमोजणी होणार असल्याने मतदारांचे मत गोपनीय राहणार आहे. दरम्यान, मतदानानंतर सर्व मतपेट्या सील करून पोलिसांच्या बंदोबस्तात औरंगाबादच्या चिकलठाण्यातील मतमोजणी केंद्रातील स्ट्रॉंग रूमकडे पाठविण्यात येतील. तर 2 फेब्रुवारीला सकाळी मतमोजणी सुरू होईल.


मतदार ओळखपत्र नसल्यास हे कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार 


निवडणुकीत मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, त्यांना ओळख पटविण्यासाठी इतर 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. ज्यात आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, आस्थापनांचे ओळखपत्र, लोकप्रतिनिधी ओळखपत्र, मतदारसंघातील संस्थासेवांचे ओळखपत्र, विद्यापीठ पदवी-पदविका प्रमाणपत्र, दिव्यांगत्व मूळ प्रमाणपत्र, केंद्र शासनाचे युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Teacher Constituency Election: मतदानासाठी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात; मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील मतदारांचा घोळ काही संपेना